Pravin darekar Reaction on sanjay raut tweet : 'राऊत किती दिवस मौन पाळतात ते पाहूया'

मौनातून मनःशांती मिळते, हे राऊत यांना उशिरा कळालं : दरेकर यांचा संजय राऊत यांना टोला
pravin darekar
pravin darekardainik gomantak

मुंबई : सध्या राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील नेते विरूद्ध भाजप नेते यांच्यात वाक युद्ध रंगलं आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापलेले आहे. यादरम्यान शिनसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या छोट्याशा एका ट्वीटमुळे पुन्हा चर्चा रंगणार असल्याचेच दिसत आहे. यावेळी राऊत यांनी कभी कभी मौन सबसे अच्छा उत्तर होता हैं... असं म्हणतं ट्वीट केलं आहे. त्यावरून विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना 'राऊत किती दिवस मौन पाळतात ते पाहूया' असे म्हटलं आहे. (Pravin darekar Reaction on sanjay raut tweet)

खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी आपल्या शांत राहण्याने हेच विरोधकांना उत्तर असतं असे ट्वीट केलं. त्यावर प्रविण दरेकर यांनी संजय राऊत यांना टोला लगावताना, कधी-कधी मौन हे प्रकृतीसाठी चांगलं असतं आणि मौनातून मनःशांती मिळते, हे राऊत यांना उशिरा कळालं, असं म्हटलं आहे.

pravin darekar
Gas cylinder Blast : पुण्यातील कात्रज परिसरात गॅस सिलिंडरचे स्फोट

दरम्यान प्रविण दरेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाने (HC) बोगस मजूर प्रकरणी दोन आठवड्यांचा दिलासा दिला आहे. त्यावरून सरकारवर टीका करताना, माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, हे मी आधीपासूनच सांगत होतो. न्यायालयात गेल्यानंतर मला 15 दिवसांचा दिलासा मिळाला आहे, असे दरेकर यांनी म्हटले आहे. तसेच पोलिसांवर (Police) दबाव आणून राज्य सरकारने माझ्याविरोधात हा गुन्हा बनवला. मात्र माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, आपले काही नेते तुरुंगात आहेत. तर अजून काही जण तुरूंगात जाण्याच्या प्रक्रियेत आहेत. कितीही दबाव आणला तरी आम्ही सरकार (Government) विरोधात आवाज उठवत राहू, असेही दरेकर यांनी म्हटलं आहे. तसेच दरेकर यांनी धनंजय शिंदे, काँग्रेचे नाना पटोले आणि भाई जगताप यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचेही सागितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com