Cruise Drug Case: ड्रग्ज प्रकरणाचा साक्षीदार प्रभाकरचा मृत्यू

Cruise Drug Case: ड्रग्ज प्रकरणाचा साक्षीदार प्रभाकरचा राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Cruise Drug Case
Cruise Drug Casedainik gomantak

Cruise Drug Case: मुंबईतील प्रसिद्ध क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर सायल यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांचे वकील तुषार खंदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाकर साईल यांचे चेंबूरमधील माहुल भागातील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. प्रभाकर याने क्रूझ पार्टीच्या छाप्यात आपण गोसावी याच्यासोबत असल्याचा दावा केला होता. तसेच त्याने केपी गोसावी हा सॅम नावाच्या व्यक्तीशी फोनवर बोलत होता. तर 25 कोटींचा सौदा 18 कोटींवर फिक्स करण्यासंदर्भात त्यांच्यात बोलणे झाल्याचेही त्याने खुलासा केला होता. (Prabhakar Sail, a witness in the Aryan Khan cruise drug case, died of a heart attack)

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात प्रभाकर साईलने (Prabhakar Sail) समीर वानखेडेवर करोडोंची लाच घेतल्याचा आरोप केला होता, त्यानंतर समीर वानखेडेची चौकशी सुरू झाली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनसीबीच्या (NCB) दक्षता पथकाने प्रभाकर सायल यालाही चौकशीसाठी बोलावले होते. त्यावेळी केपी गोसावी याने एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना लाच दिल्याचेही बोलले होते.

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानलाही अटक

या हायप्रोफाईल प्रकरणात बॉलिवूडचा (Bollywood) किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानलाही अटक करण्यात आली होती. समीर वानखेडेने 2 ऑक्टोबर 2021 रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ जहाजावर छापा टाकला होता. यादरम्यान त्यांनी आर्यन खानसह नऊ जणांना ड्रग्ज प्रकरणात अटक केली. मात्र आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाही. या प्रकरणात समीर वानखेडेचा आलेख घसरायला लागला. त्याच्यावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केल्याचा आरोप होता. नंतर समीर वानखेडे यांची बदली करण्यात आली होती.

नवाब मलिक यांनी आघाडी उघडली

याप्रकरणी महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्याविरोधात आघाडी उघडली होती. मात्र, नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आपला लढा कुणाच्या धर्म किंवा जातीशी नसून अन्यायाशी असल्याचे म्हटले होते. ते म्हणाले होते की, एनसीबी हे प्रकरण गुंतागुंतीचे करण्याचे काम करत आहे. तर वानखेडे आल्यापासून हा धंदा अधिक होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com