महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना माझा फोन टॅप करण्यात आला, असा खळबळजनक आरोप शिवसेना खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) आज केला. एकनाथ खडसेंचा फोन 67 दिवसांपर्यंत आणि संजय राऊतांचा फोन 60 दिवस टॅप झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. (phone calls of Sanjay Raut and Eknath Khadse were tapped says police)
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, "नाना पटोले (Nana Patole), एकनाथ खडसे, आणि मी समाजविघातक घटक असल्याचे खोटे सांगत फोन टॅप करण्यात आले होते होते. गृहविभागाकडून फोन टॅपिंगची परवानगी घेताना रश्मी शुक्ला यांनी आम्ही ड्रग्ज तस्कर, गँगस्टर असल्याचे सांगितले होते. आमच्या अभिव्यक्तीवर घाला घालण्यात आला. रश्मी शुक्ला यांना केंद्र सरकार संरक्षण देत आहे. हे दुर्भाग्यपूर्ण आहे "
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "पहिल्यांदा तातडीच्या आधारावर संजय राऊत यांचा सात दिवस फोन टॅप करण्यात आला आणि दुसऱ्यांदा एसीएस होमच्या परवानगीने 60 दिवस फोन टॅप करण्यात आला. मुंबई पोलिसांनी तत्कालीन एसीएस होम एस कुमार यांचा जबाबही नोंदवला आहे. एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि संजय राऊत यांचे नाव एसआयडीच्या स्वरुपात फोन टॅपिंगच्या विनंतीमध्ये असल्याचे कुमार यांनी आपल्या जबाबात सांगितले होते.
लाऊडस्पीकर वादावरुन राऊत यांनी 'मनसे'वर बोचरी टीका केली आहे. ते म्हणाले, 'आम्हाला लाऊडस्पीकरबाबत कुणीही अक्कल शिकवू नये. बाळासाहेबांनी मुस्लिम समाजाचे प्रश्न चर्चेने सोडवले होते. त्यांनी मौलवींची बैठक घेऊन त्यांची अडचण जाणून घेतली होती. मौलवींच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या मशिदींमध्ये पुरेशी जागा नसल्याने ते रस्त्यावर नमाज अदा करत होते. यावर तोडगा म्हणून बाळासाहेबांनी त्यांना मशिदींचा अफएसआय वाढवून दिला', असे राऊत म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.