Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर अज्ञातांकडून प्रवाशांना मारहाण; 4.5 लाखांचे दागिने लुटले

प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
Mumbai-Goa Accidents
Mumbai-Goa Accidents Dainik Gomantak
Published on
Updated on

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांना अडवून त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील दागिने लुटल्याची घटना घडली आहे. महामार्गावर रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातील आंबिवली येथे हा प्रकार घडला आहे.

मुंबईच्या दिशेने जीपमधून जाणाऱ्या प्रवाशांना मारझोड करत त्यांचे साडेचार लाखांचे दागिने लुटण्यात आले. याप्रकरणी पेण दादर सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai-Goa Accidents
Mahadayi Water Issue: ...तरच कर्नाटकला म्हादईचे पाणी वळवता येईल!

मुंबई-गोवा महामार्गावरून जीप क्र. एमएच ०६ एझेड १४५१ मधून एका कुटुंबातील सहा जण दापोलीवरून बोरिवली मुंबईकडे प्रवास करत होते. पहाटे पावणेतीन वाजण्याच्या सुमारास त्यांचे वाहन आंबिवली फाट्यानजीक असणाऱ्या हॉटेल साई सहारा येथे आले.

त्यावेळी एका कारमधून आलेल्या तरुणांनी त्यांच्या जीपच्या काचेवर दोन दगड मारून त्यांना शिवीगाळ केली. घाबरलेल्या चालकाने गाडी पुढे नेली असता समोरून तीन वाहनांतून आलेल्या जवळपास १२ ते १५ तरुणांनी त्यांना अडवून मारझोड केली.

शिवीगाळ करून जीपमधील प्रवाशांच्या अंगावरील सुमारे चार लाख ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने खेचून पळ काढला.

Mumbai-Goa Accidents
Opposition on Goa CM: मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचवण्यासाठीच प्रमोद सावंत यांच्याकडून कर्नाटकसाठी प्रचार

जीपमधील घाबरलेल्या प्रवाशांनी पनवेल गाठत स्थानिक पोलिसांना घडलेली हकिगत सांगितली. याप्रकरणी पेण दादर सागरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अजित गोळे करत आहेत.

प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

मुंबई-गोवा महामार्गावर नेहमी वाहनांची वर्दळ असते; मात्र रात्री वाहनांवर दगडफेक करत त्यांची लूटमार करण्याची घटना घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com