ठाणे: ईडीकडून(ED) सद्या होत असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (Shiv Sena)आमदार प्रताप सरनाईक (Pratap Saranaik) मोठे विधान केले आहे. यामध्ये केंद्र सरकार (Central Government)आणि राज्य सरकार (State Government)यांच्या भांडणात आमचा बळी जात आहे, असा घरचा आहेर प्रताप सरनाईकांनी राज्य सरकारला दिला आहे.
दरम्यान, प्रताप सरनाईकांनी माध्यमाशी बोलताना सांगितले, केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणामध्ये आमचा बळी जात आहे हे मी पूर्वीपासून सातत्याने बोलत आलो आहे. मग प्रताप सरनाईक असो की अन्य कोणी? त्याच्या वर आरोप-प्रत्यारोप होत असतात. विरोधक हे त्यांचे काम करीत असतात, असे सांगतानाच ते म्हणाले मी किरीट सोमैय्या (Kirit Somaiya) यांच्यावर 100 कोटींचा दावा दाखल केला आहे. आणि ते चुकीचा मेसेज सर्वत्र पसरवत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर असा दावा करण्यात आला आहे. आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास असून. न्यायालय जो निर्णय देईल तो आम्ही मान्य करू, असे सरनाईक म्हणाले.
कुटुंबीयांना त्रास
राजकारण करत असताना राजकीय पक्षांना आम्ही अंगावरही घेतो. मात्र यामध्ये कुणाच्या ही कुटुंबीयांना आणत नाही. मात्र आता आमच्या कुटुंबीयांवर घाव घातला जात आहे. त्यांनाही काही प्रकरणांमध्ये अडकवले जात आहे. आणि त्याचा कुटुंबीयांना सर्वात जास्त त्रास होत आहे, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना संगितले.
राज्यपालांकडून कडून आमदारांची नियुक्ती
राज्यपाल(Governor) नियुक्त आमदारांच्या मुद्द्यावरही त्यांनी यावेळी भाष्य करत म्हटले, राज्यपालांकडे 12 आमदारांचा प्रश्न आहे. त्याचबरोबर यामध्ये न्यायालयाने हस्तक्षेप करत आपल यासंदर्भात निरीक्षण नोंदविले आहे. त्यामुळे तात्काळ 12 आमदारांच्या नियुक्ती बाबत राज्यपाल विचार करतील अशी आशा सरनाईकांनी यावेळी व्यक्त केली.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची देवावर श्रद्धा आहे की नाही
कोरोना मुळे बंद असलेले मंदिरे (Temples)उघडण्याच्या मुद्द्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. बंद असलेली मंदिरे उघडावी अशी सर्वसामान्यांची इच्छा आहे. लोकांची देवावर श्रद्धा आहे. तुमची देवावर श्रद्धा आहे मग मुख्यमंत्र्यांची श्रद्धा नाही का? असा सवाल केला असता, मुख्यमंत्र्यांची देवावर फार मोठी श्रद्धा आहे. परंतु, कोविडच्या (covid 19)संकटात मंदिरे उघडली तर तिसऱ्या लाटेला आमंत्रण मिळेल. त्यामुळे देव्हाऱ्यातच देवाची पूजा करण्यात यावी. सर्व मंदिरे उघडण्यासाठी अजून काही काळ प्रतिक्षा करावी, असे सांगत लवकरच शाळाही उघडतील. याबाबत सरकार यावर तोडगा काढणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.