ठाण्यात आज मिळतंय एक रुपयात एक लिटर पेट्रोल

आमदार प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवस निमित्ताने शिवसेनाचा अनोखा उपक्रम
Pratap Sarnaik
Pratap SarnaikDainik Gomantak
Published on
Updated on

ठाणे : महाराष्ट्रातील नागरीक वाढत्या अन्नधान्याच्या किंमती, भडकलेले इंधनाचे दर, उच्चांकी गाठलेल्या खाद्य तेलाच्या किंमती, दिवसें -दिवस कोलमडत असलेलं सामान्य नागरीकांचे अर्थिक बजेटकडे लक्ष वेधण्यासाठी ठाण्यातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पक्ष अनोखा उपक्रम राबवत आहे.(one rupee petrol in one rupee in thane)

Pratap Sarnaik
भाजप नाच्या पोरांसारखा नवनीत राणांच्या इशाऱ्यावर नाचतो; शिवसेनेचा बोचरा वार

राज्यातील नागरिक महागाईने सर्वसामान्यांच्या खिशावर भार वाढत आहे. इंधनाचे वाढते दर चिंतेत भर टाकत असताना ठाणेकरांना मात्र आज एक दिवस का असेना एका रुपयात एक लिटर पेट्रोल मिळणार आहे. हे कसं काय शक्य आहे ? असं आपल्याला वाटेत असेल ना…तर हे सत्य असून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक(pratap sarnaik) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा उपक्रम राबवला आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

Pratap Sarnaik
हनुमान चालीसा वाचणे गुन्हा असेल तर सरकारने माझ्यावरही देशद्रोहाची कलमे लावावीत: फडणवीस

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कापूरबावडी येथील तत्वज्ञान विद्यापीठाजवळील कैलाश पेट्रोल पंपावर फक्त एका रुपयात पेट्रोल दिलं जाणार आहे. सकाळी ११ वाजल्यापासून एक रुपयात एक लिटर पेट्रोल दिलं जाणार आहे. सध्या पेट्रोलचे दर गगनाला भिडले असताना ठाणेकर या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी गर्दी करण्याची शक्यता आहे. प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे.

महाराष्ट्रात सद्या शिवसेना भाजप यांच्यात खडाजंगी जुंपली असून राणा दाम्पत्य आणि संजय राउत थांबायला तयार नाही. राजकिय विश्लेषकांनी स्पष्ट केल्यानुसार कधी काळी महाराष्ट्राच्या राजकिय वर्तुळात ऊसदरवाढ, दुधदरवाढ यांसारख्या सामान्य नागरिकांच्या प्रश्नावरुन खडाजंगी व्हायच्या मात्र सद्याचं राजकारण पाहता तोच का हा महाराष्ट्र असा ही राजकिय तज्ज्ञांमधून प्रश्न केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com