Omkar Elephant
Omkar ElephantDainik Gomantak

Omkar Elephant: 'ओंकार' तात्पुरता 'वनतारा'मध्ये, कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय; उच्चस्तरीय समिती नेमणार

Omkar Elephant Update: ओंकार हत्तीला तात्पुरते ‘वनतारा’ येथे पाठवावे. तसेच उच्चस्तरीय समिती नेमून पुढील निर्णय घ्यावा, असा निर्णय याबाबतची जनहित याचिका कायम ठेवून कोल्हापूर सर्किट बेंचने दिला.
Published on

कोल्हापूर: ओंकार हत्तीला तात्पुरते ‘वनतारा’ येथे पाठवावे. तसेच उच्चस्तरीय समिती नेमून पुढील निर्णय घ्यावा, असा निर्णय याबाबतची जनहित याचिका कायम ठेवून कोल्हापूर सर्किट बेंचने दिला.

येथील डिव्हिजन बेंचचे न्या. मकरंद कर्णिक व न्या. अजित कडेठाणकर यांच्यासमोर ही सुनावणी झाली, अशी माहिती याचिकाकर्ते प्रा. रोहित कांबळे यांना सहकार्य करणारे ॲड. उदय वाडकर आणि ॲड. केदार लाड यांनी दिली.

Omkar Elephant
Goa Cabinet Decision: मुख्य अभियंत्यासाठी वयाची अट शिथिल, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग, ईपीएफ परतावा, वाचा गोवा कॅबिनेटचे तीन मोठे निर्णय?

‘ओंकार’ प्रेमी बांद्यात एकवटले

कोल्हापूर सर्किट बेंचने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओंकारला तात्पुरते गुजरात येथील ‘वनतारा’ येथे पाठवावे, असा निर्णय दिल्याने बांद्यात ओंकार प्रेमी नागरिकांनी याला विरोध दर्शविला आहे.

यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले असून, इन्सुली खामदेव नाका येथे स्थानिक मोठ्या संख्येने गोळा झाले होते. यावेळी ओंकारला वनतारा येथे न पाठविता त्याला मोर्ले वा कर्नाटकातील नैसर्गिक अधिवासात पाठवावे, अशी मागणी लोकांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com