अनिल देशमुखांनी किंवा त्यांच्या ऑफीसमधील कुणीही कधीही बार किंवा अन्य कुठूनही पैसे वसुल करण्यासाठी मला सांगितलं नव्हतं. अशी माहिती सचिन वाझेनं (Sachin Vaze) मंगळवारी चांदीवाल आयोगासमोर दिली. त्यामुळे परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी आपल्या पत्रातून अनिल देशमुखांवर केलेल्या खळबळजनक भ्रष्टाचाराच्या आरोपांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चांदिवाल आयोगासमोर मंगळवारी सचिन वाझेची उलटतपासणी करण्यात आली. ज्यात “बार मालकांकडून पैसे गोळा करायला अनिल देशमुख यांनी सांगितलं होतं का?" यावर "मला काही आठवत नाही" या सचिन वाझेच्या उत्तरानं सर्वजण बुचकुळ्यात पडले आहेत. कारण सचिन वाझे यांच्या या उत्तरानं हे खरंच अनिल देशमुख यांनी बार मालकांकडनं पैसे गोळा करायला सांगितले होतं का?, हा प्रश्न अनुत्तरीत राहतो.
यानंतर आता चांदिवाल आयोगापुढे 21 डिसेंबरला होणाऱ्या पुढील सुनावणीत सचिन वाझेंची (Sachin Vaze) पुढची उलटतपासणी घेण्यात येईल. त्याआधी अनिल देशमुख यांना 16 डिसेंबर तर सचिन वाझेला 20 डिसेंबर रोजी आयोगापुढे हजर करण्याचे निर्देश जेल प्रशासनाला देण्यात आले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.