Nitin Gadkari: तीन वर्षांत दुग्धोत्पादन दुप्पट करा;अन्यथा सक्तीची स्वेच्छानिवृत्ती

दुग्धोत्पादन व्यवसाय दुप्पट करा. हे टार्गेट पूर्ण केले तर गळ्यात फुलांची माळ घालू, आणि जर जे टार्गेट पूर्ण केले नाही तर सक्तीची स्वेच्छानिवृत्ती (Voluntary retirement)देण्यात येईल.
Nitin Gadkari
Nitin GadkariDainik Gomantak
Published on
Updated on

नागपूर : नागपुरामध्ये (Nagpur)महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या (Maharashtra University of Animal and Fisheries Sciences)पशु रुग्णालयाच्या (Animal Hospital)नव्या इमारतीच्या उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले. नितीन गडकरी हे आपल्या सडेतोड वक्तव्यासाठी सर्वांच्या परिचयाचे आहेत. नागपुरात त्यांच्या सडेतोड स्वभावाची पुन्हा एकदा या कार्यक्रम प्रसंगी प्रचिती आली. दुग्धोत्पादन व्यवसायाबाबत बोलताना असताना ते टार्गेट दुप्पट करा. आणि टार्गेट पूर्ण केले तर गळ्यात फुलांची माळ घालू असे सांगितले. जर हे टार्गेट पूर्ण झाले नाही तर सक्तीची स्वेच्छानिवृत्ती (Voluntary retirement)दिली जाईल. अशा कणखर शब्दांत गडकरींनी पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापिठाचे शास्त्रज्ञ आणि प्राध्यापकांना सूचना दिल्या आहेत.

Nitin Gadkari
नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली

नागपुरात पार पडलेल्या एका कार्यक्रममध्ये राज्याचे पशूसंवर्धन मंत्री सुनील केदारही उपस्थित होते. आता नितीन गडकरींच्या वॉर्निंगनंतरही पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापिठाचे शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक कामाला लागणार का? हे पाहणे सर्वासाठी उत्सुकत्याचे ठरणार आहे.

पुढच्या तीन वर्षांत दुग्धोत्पादन (Dairy production)दुप्पट करून करा. त्यासाठी चांगल्या दर्जेच्या गाईं निर्माण करा, असेही आवाहन नितीन गडकरींनी शास्त्रज्ञांना केले आहे. जर तुम्ही हे करून दाखवलले तर तुमचे सातवा वेतन आयोग आणि पदोन्नती केली जाईल. असे आश्‍वासन गडकरींनी यावेळी दिले. तसेच पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, जर विद्यापीठाचे प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ यांनी हे जमले नाही तर जनता ज्या विद्यापीठाला पांढरा हत्ती म्हणते, त्या पांढऱ्या हत्तीची आम्हाला गरज असणार नाही. असा इशाराही गडकरींनी यावेळी बोलताना दिला.

तसेच, नितीन गडकरी येवढ्यावरच न थांबता, त्यांनी या नव्या रूग्णालयात वर्षाकाठी किती शस्त्रक्रिया (Surgery)होणार? किती प्राण्यांवर उपचार होणार? जास्तीचे दूध देणाऱ्या गाई किती तयार होतील? याचा आकडाही मला सांगा, अशी विचारणाही तेथील अधिकाऱ्यांना केली. ठरवलेले टार्गेट जर तुम्ही पूर्ण करू शकलात, तर तुमच्या गळ्यात फुलांची माळ घालू, अन्यथा तुम्हाला थेट सेवानिवृत्ती देऊ. आता गडकरींच्या आव्हानानंतर लोकांमध्ये आधीच पांढरा हत्ती अशी ख्याती असलेल्या महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक (Scientists and professors)येथून पुढे कामाला सुरुवात करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com