मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे भाजप आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का दिला. खुनाचा प्रयत्न प्रकरणी नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court)नकार दिला. मात्र, याच प्रकरणातील आणखी एक आरोपी मनीष दळवी याचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने मंजूर केला. यापूर्वी सुध्दा नितेश राणे (Nitesh Rane)यांचा डिसेंबरमध्ये सिंधुदूर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. (Nitesh Rane Bail Hearing News Updates)
शिवसेना कार्यकर्ता संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा संबंध आहे. सिंधुदूर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सेनेचे (Shivsena) नेते संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या मास्टरमाईंडला पोलिसांनी दिल्ली येथून ताब्यात घेतलं. त्यानंतर संपूर्ण प्रकरणात नितेश राणेंचा हात असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाल्याचं म्हटलं जात. या संदर्भात डिसेंबरमध्ये कणकवली पोलीस ठाण्यात नितेश राणे आणि इतरांविरुद्ध कलम 307 (हत्येचा प्रयत्न), 120 (ब) (गुन्हेगारी कट) आणि 34 (सामान्य हेतू) अन्वये भारतीय दंड संहिता (आयपीसी) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला होता.
'मला निवडणुकीत सहभागी होण्यापासून रोखण्याचे षड्यंत्र'
30 डिसेंबर रोजी झालेल्या सिंधुदूर्ग (Sindhudurg) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहभागी होण्यापासून रोखण्याच्या उद्देशानेच आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा आमदार नितेश राणे यांनी आपल्या याचिकेत केला आहे. परंतू या हल्ल्यामागे नितेश राणेंचा हात असल्याचे दाखवण्यासाठी पोलिसांनी पुरेसे पुरावे गोळा केले आहेत, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयासमोर केला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.