NCP in Karnataka Election 2023: नागालँडनंतर आता मिशन कर्नाटक, राष्ट्रीय दर्जा रद्द झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा निर्णय

राष्ट्रवादी कर्नाटकात 40 ते 45 जागांवर आपले उमेदवार उभे करू शकतो.
NCP leader Sharad Pawar
NCP leader Sharad Pawar Dainik Gomantak
Published on
Updated on

NCP in Karnataka Election 2023: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा अलिकडेच निवडूक आयोगाने रद्द केला. राष्ट्रवादी आता प्रादेशिक पक्ष म्हणून ओळखला जाईल. दरम्यान, या घडामोडीनंतर राष्ट्रवादी मोठी तयारी करताना दिसत असून, आगामी कर्नाटक निवडणुकीत पक्ष उमेदवार उभे करणार असल्याची बातमी समोर आली आहे.

राष्ट्रवादी कर्नाटकात 40 ते 45 जागांवर आपले उमेदवार उभे करू शकतो. मात्र, जागा किती असतील, याची औपचारिक घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

कर्नाटक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाने येथील लढत अधिकच रोमांचक होणार आहे. आतापर्यंत कर्नाटक निवडणुकीतील मुख्य लढत भाजप-काँग्रेस-जेडीएस यांच्यातच होणार असल्याचे मानले जात होते. पण आता हे समीकरण बदलू शकते.

पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा नुकताच काढून घेण्यात आल्याने कर्नाटक निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले, आम्हाला पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्ष बनायचे असेल तर असे निर्णय घ्यावे लागतील. पक्षाचा हा निर्णय म्हणजे पक्षाचा राष्ट्रीय दर्जा परत मिळण्यासाठी आहे. बहुसंख्य मराठी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र एकीकरण समितीसोबत युती करेल अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

NCP leader Sharad Pawar
CBI कडून दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना समन्स, दारू घोटाळ्याप्रकरणी होणार चौकशी

राष्ट्रवादीचा हा निर्णय विरोधी पक्षांच्या ऐक्याला धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या या घोषणेच्या एक दिवस आधी शरद पवार यांनी दिल्लीतील विरोधी एकजूट मजबूत करण्यासाठी राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली होती. मात्र त्यानंतर राष्ट्रवादीच्या या निर्णयामुळे कर्नाटक निवडणुकीत रंजक समीकरण निर्माण झाले आहे.

या चर्चेत विरोधी पक्षांना एकाच व्यासपीठावर आणण्याची प्रक्रिया पुढे नेण्याचा संकल्प शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी केल्याचे सांगण्यात येते. तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी या पक्षांनाही सोबत घेण्याचा पवारांनी आग्रह धरला. खरगे यांच्या नवी दिल्लीतील 10 राजाजी मार्गावरील निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपालही उपस्थित होते.

दरम्यान, नुकतेच झालेल्या नागालँड विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला सात जागांवर विजय मिळाला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीने तिथे भाजप सरकारला पाठिंबा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com