महाराष्ट्रात (Maharashtra) आता हळूहळू कोरोना रुग्ण (COVID-19) आणि संसर्गामध्ये घट झाली असून राज्य सरकार अनेक नियम शिथिल करत आहे याच अनुषंगाने राज्य सरकारने नवरात्री (Navratri 2021), दुर्गा पूजा (Durga Puja) आणि दसऱ्यासाठी (Dussehra) नवीन नियमावली जारी केली आहे, 7 ऑक्टोबरपासून नवरात्र सुरू होत आहे आणि 15 ऑक्टोबर रोजी दसरा आहे. आणि आता या नवीन नियमांनुसार राज्य सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील गरबा-दांडियाचे आयोजन करता येणार नाही (No Garbha, No Dandiya). (Navratri 2021: Maharashtra government rules for Navratri 'No Garbha, No Dandiya')
याशिवाय, राज्य सरकारच्या नियमांनुसार देवीच्या मूर्तींच्या उंचीवरही मर्यादा ठेवण्यात आली आहे. सार्वजनिक पंडाल आणि मंडळांमध्ये मूर्तींची उंची 4 फुटांपेक्षा जास्त ठेवता येत नाही. घरात पूजेसाठी सुद्धा 2 फूट पेक्षा जास्त उंचीची मूर्ती आणता येणार नाही. यावर्षीही नवरात्रोत्सव आणि इतर सण साधेपणाने साजरे करण्यास सरकारकडून सांगितले आहे. यासह, दुर्गा पंडालमध्ये 5 हून अधिक कामगारांच्या उपस्थितीवर बंदी घालण्यात आली आहे. आरती-भजन-कीर्तनासाठी किंवा रावण दहनमध्ये गर्दी जमा करण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे.
मार्गदर्शक तत्त्वांनुसार मंडप तयार करण्यापूर्वी नवरात्रौत्सव मंडळांना पालिका प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे . यासाठी ऑनलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे. पालिकेने निश्चित केलेल्या आकारानुसार मंडप तयार केले जातील. पर्यावरण लक्षात घेऊन मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसची बनवल्या जाणार नाहीत. शाडूच्या मूर्ती आणा. सजावट देखील पर्यावरणास अनुकूल असावी अशे काही नियम देखील सरकारने घातले आहेत.
नवरात्रोत्सव, दसरा आणि रावणदहनाच्या कार्यक्रमांमध्ये गर्दी गोळा न करण्याची जबाबदारी आयोजकांची असेल असे कडक निर्देश देण्यात आले आहेत . सण आयोजित करण्याऐवजी त्यांना आरोग्यविषयक जागरूकता वाढवण्याशी संबंधित कार्यक्रम आयोजित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उदाहरणार्थ, ते रक्तदान शिबिरे आयोजित करू शकतात. राज्य सरकारने जारी केलेल्या एसओपीनुसार, 'माझे कुटुंब, माझी जबबदारी' या सरकारी आरोग्य उपक्रमांना प्रसिद्धीसाठी प्रोत्साहित करण्यात आले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.