शिवसेना नेते एकनाथ शिंदे भाजपमध्ये येणार ? भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचा गौप्यस्फोट

एकनाथ शिंदे हे आता शिवसेनेला कंटाळले असून लवकरच त्यांना भारतीय जनता पक्षात घेऊ असे विधान नारायाण राणे यांनी केले आहे.
Narayan Rane has stated that Eknath Shinde is unhappy in Shiv Sena
Narayan Rane has stated that Eknath Shinde is unhappy in Shiv SenaDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय जनता पक्षाचे (BJP) नवनिर्वाचित सूक्ष्म व लघुउद्योग केंद्रीय मंत्री नारायाण राणे (Narayan Rane) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना (shiv Sena) नेते एकनाथ शिंदे हे शिवसेनेत नाखुश असल्याचे म्हणत त्यांना कोणत्याही कामासाठी मातोश्रीची परवानगी घ्यावी लागते असे सांगितले आहे. एकनाथ शिंदे हे आता शिवसेनेला कंटाळले असून लवकरच त्यांना भारतीय जनता पक्षात घेऊ असे विधान नारायाण राणे यांनी केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तूळात एकच खळबळ माजली आहे, भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री सध्या जन आशीर्वाद यात्रा करत असून याच दरम्यान वसईमध्ये पत्रकारांशी बोलताना नारायण राणे यांनी या गौप्यस्फोट केला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सध्या जन आशीर्वाद यात्रेत व्यस्त असून शनिवारी ते पालघरमध्ये होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधला, जन आशीर्वाद यात्रेच्या स्वागतासाठी चिंचोटी येथे ढोल-ताशांच्या गजरात, आदिवासींच्या तारपा नृत्याचे आयोजन करण्यात आले होते.

Narayan Rane has stated that Eknath Shinde is unhappy in Shiv Sena
राणेंनी काढलेल्या जनअर्शिवाद यात्रेवर मुंबई पोलिसांची कारवाई, 19 गुन्ह्यांची नोंद

पत्रकारांशी संवाद साधताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतिवर टीका केली, तसेच आदित्य ठाकरे यांना चिरंजीव मंत्री म्हणत त्यांच्यावर देखील टीका केल्याचे पहायला मिळाले आहे. राज्यात सध्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्षांमध्ये कलगीतुरा रंगला असताना नारायण राणेंचे विधान शिवसेनेला चिंतेत टाकणारे आहे.

दरम्यान, या सर्व प्रकारावर एकनाथ शिंदे यांची काय प्रतिक्रीया आहे हे देखील जाणून घेणे महत्वाचे असणार आहे. कारण राज्यात आघाडी सरकार आल्यानंतर देखील एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार होते, मात्र त्यांना संधी न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा रंगली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com