Malvan: शिवरायांच्या पुतळ्यावरुन राजकोट किल्ल्यावर ठाकरे-राणे समर्थक भिडले; मालवणमध्ये तणाव

Malvan Sindhudurg: राजकोट किल्ल्यावर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाहणी केली.
Malvan: शिवरायांच्या पुतळ्यावरुन मालवणमध्ये तणाव; राजकोट किल्ल्यावर ठाकरे - राणे समर्थक भिडले
Malvan Sindhudurg
Published on
Updated on

Malvan Sindhudurg

सिंधुदुर्ग: मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळा कोसळल्याने गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकारण चांगलच तापलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज (२८ ऑगस्ट) शिवरायांच्या पुतळा कोसळलेल्या किल्ल्याची पाहणी केली.

याचवेळी किल्ल्यावर नारायण राणे आणि समर्थक दाखल झाले. आदित्य ठाकरे पाहणी करत असताना ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये राडा झाला आहे.

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. ४ डिसेंबर २०२३ रोजी उभारण्यात आलेला शिवरायांचा पुतळा दोन दिवसांपूर्वी कोसळला. यानंतर सिंधुदुर्गासह महाराष्ट्रात यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे.

राजकोट किल्ल्यावर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाहणी केली. यावेळी आदित्य ठाकरे, जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार उपस्थित होते. याचवेळी किल्ल्यावर खासदार नारायण राणे यांनी समर्थक देखील दाखल झाले.

ठाकरे आणि राणे समर्थकांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. किल्ल्यावर समर्थकांच्या घोषणाबाजीनंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली. काही ठाकरे व राणे समर्थक एकमेंकांसोबत भिडले. पोलिसांनी समर्थकांना आडविण्याचा प्रयत्न केला.

Malvan: शिवरायांच्या पुतळ्यावरुन मालवणमध्ये तणाव; राजकोट किल्ल्यावर ठाकरे - राणे समर्थक भिडले
मोठी बातमी! गोव्यात CAA अंतर्गत पाकिस्तानच्या ख्रिश्चन नागरिकाला दिले जाणार भारतीय नागरिकत्व

राजकोट किल्ल्यावर आदित्य ठाकरे येताच राणे समर्थक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. काही वेळानंतर माजी खासदार निलेश राणे देखील राजकोट किल्ल्यावर दाखल झाले असून, दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा सुरु आहे. पोलिसांनी सध्या किल्ल्यावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

शिवरायांच्या पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीच्या वतीने आज मालवण बंदची हाक देण्यात आली होती. तसेच, निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, राजकोट किल्ल्यावर पाहणी करताना दोन्ही गटाच्या समर्थकांमध्ये राडा सुरु झाला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार राजकोट किल्ल्यावर सुरु असलेल्या वाद मिटविण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी पुढाकार घेतला असून, समर्थकांना शांत करण्यासाठी ते प्रयत्न करतायेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com