खंडणी प्रकरणी बिल्डरची गोळ्या झाडून हत्या

एसआयटी करणार तपास
nanded city builder sanjay biyani succumbed to bullet injuries after being shot by assailants
nanded city builder sanjay biyani succumbed to bullet injuries after being shot by assailants Dainik Gomantak
Published on
Updated on

नांदेडचे बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची त्यांच्या घराबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. संजय बियाणी यांचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचवेळी त्यांच्या चालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस अद्याप हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर नांदेडमध्ये तणावाचे वातावरण आहे. पोलीस घटनास्थळी तपास करत आहेत. संजय बियाणी हे नांदेडचे मोठे उद्योगपती आहेत. खंडणीच्या कारणावरून त्याची हत्या (Murder) करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

एसआयटी तपास करणार

याप्रकरणी विमंतल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेच्या तपासासाठी एसआयटी (SIT) नेमण्यात आली आहे. हल्लेखोरांना शोधण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

nanded city builder sanjay biyani succumbed to bullet injuries after being shot by assailants
गर्लफ्रेंडला गिफ्ट म्हणून स्मार्टफोन दिला, मग प्रियकराने उचललं टोकाच पाऊल

देशी पिस्तुल वापरले

पोलिसांनी (police) सांगितले की, गुन्हेगारांनी देशी बनावटीचे पिस्तूल वापरले आहे, जे नांदेड आणि आसपासच्या परिसरात हल्लेखोरांसाठी एक सामान्य शस्त्र आहे. हल्लेखोरांनी ज्या पद्धतीने बिल्डरवर गोळीबार केला, त्यावरून ते व्यावसायिक गुन्हेगार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात गोळी झाडली

नांदेडचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर सकाळी साडेअकराच्या सुमारास घराबाहेर गोळ्या झाडण्यात आल्या. बिल्डर कारने शारदा नगर येथील त्यांच्या घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. मिळालेल्या माहितीनुसार, बिल्डरच्या डोक्यात गोळी घुसली होती. सध्या पोलिसांनी शहरात नाकाबंदी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com