कायद्यापेक्षा धर्म मोठा नसतो, लाऊडस्पीकरच्या वादात राज ठाकरेंचं वक्तव्य

3 मे 2022 नंतर मला काय करायचे ते मी बघेन; राज ठाकरे
muslims should understand religion is not bigger than law says mns raj thackeray amid loudspeaker row
muslims should understand religion is not bigger than law says mns raj thackeray amid loudspeaker rowDainikGomantak

अजान आणि आरतीशी संबंधित लाऊडस्पीकरच्या वादावरुन मुस्लिमांनी कायद्यापेक्षा धर्म मोठा नाही हे समजून घ्यायला हवे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “आम्हाला महाराष्ट्रात दंगली नको आहेत. पूजेला कोणाचाही आक्षेप नाही. पण जर (मुस्लिम) लाऊडस्पीकरवर करत असतील, तर आपणही लाऊडस्पीकर वापरू. कायद्यापेक्षा धर्म मोठा नाही हे मुस्लिमांनी (Muslim) समजून घेतले पाहिजे. 3 मे 2022 नंतर मला काय करायचे ते मी बघेन.

muslims should understand religion is not bigger than law says mns raj thackeray amid loudspeaker row
भाजप आमदाराच्या वाढल्या अडचणी, महिलेला जीवे मारण्याचं प्रकरणं आलं अंगलट

राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, “मला वाटते की अशा गोष्टींना त्यांच्याच शैलीत उत्तर दिले पाहिजे. नाहीतर या लोकांना समजणार नाही..." वृत्तानुसार ठाकरे 5 जून रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्येला भेट देणार आहेत. त्यांची पुढील जाहीर सभा 1 मे रोजी औरंगाबादेत होणार आहे.

तत्पूर्वी शनिवारी, मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी पांढरा-कुर्ता-पायजमा परिधान करून आणि भगवी शाल परिधान करून हनुमान जयंतीनिमित्त पुण्यातील सर्वात जुने समजल्या जाणाऱ्या खालकर आळी हनुमान मंदिरात हनुमानाची आरती केली.

खरं तर, या महिन्याच्या सुरुवातीला मनसे प्रमुखांनी आपल्या दोन रॅलींमध्ये, मशिदींमधून लाऊडस्पीकर न काढल्यास या धार्मिक स्थळांसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालिसाचे पठण केले जाईल, असा इशारा दिला होता. राज ठाकरे यांनी राज्य सरकारला त्यांच्या मागणीवर 3 मे पूर्वी कार्यवाही करण्याचा अल्टिमेटमही दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com