मुंबईत अंडर कन्स्ट्रक्शन ब्रिज कोसळला,14 मजूर जखमी

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सपरिसरात मेट्रोच्या अंडर कन्स्ट्रक्शन उड्डाणपुलाचा एक भाग कोसळल्यानंतर मोठा अपघात झाला आहे (Bridge Collapse in Bandra Kurla Complex)
Mumbai: Under construction bridge collapse in Bandra Kurla Complex
Mumbai: Under construction bridge collapse in Bandra Kurla Complex Twitter @ANI
Published on
Updated on

मुंबईच्या (Mumbai) वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (Bandra Kurla Complex) परिसरात मेट्रोच्या अंडर कन्स्ट्रक्शन उड्डाणपुलाचा (Metro Bridge) एक भाग कोसळल्यानंतर मोठा अपघात झाला आहे (Bridge Collapse in Bandra Kurla Complex ) . हा अपघात शुक्रवारी पहाटे 4.40 च्या सुमारास झाला असून रात्री मेट्रोचे काम चालू असताना हा अपघात घडला आहे. या अपघातात 14 जण जखमी झाले असून त्यांना विंदेसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आणखी काही लोक इथे अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. घटनास्थळी पोहोचून अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केली असून अग्निशमन दलाची टीम शोध मोहीम राबवत आहे.(Mumbai: Under construction bridge collapse in Bandra Kurla Complex )

डीसीपी (झोन 8) मंजुनाथ सिंगे म्हणाले, "बीकेसी मुख्य रस्ता आणि मुंबईतील सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडला जोडणाऱ्या निर्माणाधीन उड्डाणपुलाचा एक भाग पहाटे साडेचारच्या सुमारास कोसळला. काही लोकांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोणतीही जीवितहानी नाही आणि कोणतीही व्यक्ती बेपत्ता नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे मेट्रो पुलावर काम सुरू होते. काही कामगार पुलाच्या वर काम करत होते, काही खाली होते. वर काम करणाऱ्या कामगारांनी बार धरून उडी मारली जेव्हा पूल कोसळला, काही त्याला लागून असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये पडले आणि काही लोक पुलाखाली दबल्यामुळे जखमी झाले आहेत.

Mumbai: Under construction bridge collapse in Bandra Kurla Complex
गणपतीपुळेचं पर्यटन भोवलं; एकजण थोडक्यात बचावला तर एकाचा दुर्देवी मृत्यू

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com