मुंबई पोलिसांचे डिलिव्हरी बॉईजवर लक्ष, नियमांच्या उल्लंघनाबाबत दिले कडक आदेश

मुंबई पोलिसांनी डिलिव्हरी बॉयबाबत कडक संदेश पाठवण्यात आला आहे.
Mumbai Police News |Mumbai Police on Delivery boy
Mumbai Police News |Mumbai Police on Delivery boy Dainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) डिलिव्हरी बॉयबाबत (Delivery Boy) कडक संदेश पाठवण्यात आला आहे. वास्तविक, मुंबई पोलीस प्रमुखांनी कुरिअर सेवा, ऑनलाइन विक्री आणि खाद्यपदार्थ वितरण या क्षेत्रातील सुमारे 30 कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली आणि त्यांना त्यांच्या डिलिव्हरी बॉईजना प्रशिक्षण देण्याचे आणि डिलिव्हरीसाठी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीवरती तसेच नियमाचे उल्लंघन करत नाहीत यावरती लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. डिलिव्हरी वेळेवर न दिल्याने डिलिव्हरी बॉयच्या पगारावर परिणाम होत असल्याने मुंबई पोलिसांनी सूचना दिली आहे. (Mumbai Police on Delivery boy News)

Mumbai Police News |Mumbai Police on Delivery boy
HC च्या निर्णयाविरोधात महाराष्ट्रातील भाजपची सर्वोच्च न्यायालयात धाव

नाहीतर डिलिव्हरी बॉयवर कडक कारवाई केली जाईल

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी लाईव्ह स्ट्रिमिंग दरम्यान स्पष्ट केले आहे की वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या डिलिव्हरी बॉईजवर पोलीस दल नरमाईने वागणार नाहीये. पोलिस डिलिव्हरी बॉयला सौम्य वागणूक देतात, अशी नागरिकांची अनेकदा तक्रार असते, त्यामुळेच असे होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांना आधीच कडक संदेश पाठवण्यात आला असून कंपनी आणि तिच्या डिलिव्हरी बॉयवर कडक कारवाई केली जाईल.

कंपनीवरही कडक कारवाई केली जाईल,

वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना कोणताही डिलिव्हरी बॉय पकडला गेला तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईलच, शिवाय हा मुलगा ज्या कंपनीत काम करतो, त्याच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, असे पोलीस प्रमुखांनी यावेळी सांगितले आहे. तसेच, कुरिअर बॉईजने केलेल्या गंभीर गुन्ह्यांची संख्या पाहता, कंपन्यांनी त्यांना कामावरती घेताना त्यांची पूर्ववर्ती योग्यरित्या तपासणी करावी आणि त्यांना योग्य पोशाख प्रदान करावे याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

Mumbai Police News |Mumbai Police on Delivery boy
कोल्हापूर : कासारवाडी - सादळे घाटात अपघात; एक ठार 25 जखमी

खार येथील एका ज्वेलर्सच्या घरी नुकतीच घडलेल्या एका घटनेनंतर ही कारवाई सुरू करण्यात आली, जेव्हा काही जण कुरिअर बॉईज म्हणून घरात घुसले आणि 30 लाखांचे दागिने आणि रोख रक्कम लुटून पळून गेले. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली असून घटनेच्या 24 तासांत लुटलेला माल देखील जप्त केला आहे. पांडे पुढे म्हणाले की, मुंबई पोलिसांनी फूड कुरिअर डिलिव्हरी कंपन्यांना इशारा दिला आहे की त्यांच्याद्वारे नियुक्त केलेले डिलिव्हरी बॉय वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना किंवा कोणत्याही गुन्ह्यात सहभागी झाल्यास त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com