Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबचं लांब रांगा
Mumbai Goa Highway TrafficDainik Gomantak

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबचं लांब रांगा

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. नागोठाणे येथे गेल्या एका तासापासून वाहतूक कोंडी झाल्याचं सांगितलं जात आहे.
Published on

मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. नागोठाणे येथे गेल्या एका तासापासून वाहतूक कोंडी झाल्याचं सांगितलं जात आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. एका कंपनीची भलीमोठी मशीन घेऊन जात असताना रेल्वे उड्डाणपूलाखाली अडकली. त्यामुळे नागोठाणे ते वाकण यादरम्यान दोन किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली. महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या वाहतूक कोंडीमुळे मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे.

काही दिवसांपूर्वी, मुंबई-गोवा महामार्गावर पेडणे येथे पुन्हा दरड कोसळल्याने दोन्ही लेनवरील वाहतूक ठप्प झाली होती. मालपे न्हयबाग येथे रस्ता कडेला संरक्षक भिंतीवरील तांबड्या मातीचा भराव रस्त्यावर आल्याने महामर्गावरील वाहतूक बंद झाली होती. पंधरा दिवसात त्याच भागात दुसऱ्यांदा दरड कोसळण्याची घटना घडली होती.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबचं लांब रांगा
Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

दरम्यान, गेल्या 12 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न कोकणवासीय विचारतायेत. राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा उपस्थित केला होता. मुंबई-गोवा महामार्गाचे काम 2007 मध्ये सुरु झाल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. 2007 नंतर एवढी सरकारे आली पण महामार्गाचे काम होऊ शकले नाही, अशी खंत राज यांनी व्यक्त केली होती. रस्त्यांच्या दुरावस्थेवर ते म्हणाले होते की, केवळ कोकणातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. मुंबईहून नाशिकला जाण्यासाठी 8 तास लागतात. या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्यांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com