'गर्भवती असल्याच्या वृत्तावर बॉयफ्रेंडचा निष्काळजीपणा आत्महत्येस...': Mumbai HC

Mumbai High Court: जर गर्लफ्रेंडने आपण गरोदर असल्याचे सांगितले आणि त्यावर बॉयफ्रेंडने उदासीनता दाखवली, तर त्यास आत्महत्येस प्रवृत्त करणे असे होत नाही.
Mumbai High Court
Mumbai High CourtDainik Gomantak
Published on
Updated on

Mumbai High Court: जर गर्लफ्रेंडने आपण गरोदर असल्याचे सांगितले आणि त्यावर बॉयफ्रेंडने उदासीनता दाखवली, तर त्यास आत्महत्येस प्रवृत्त करणे असे होत नाही. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या एका मुलाला जामीन मंजूर करताना मुंबई उच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले आहे. या मुलाच्या 16 वर्षीय मैत्रिणीने आत्महत्या केली होती. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये ती गरोदर नसल्याचे स्पष्ट झाले होते.

मुलीने तिच्या खोलीत गळफास लावून घेतला : ठाणे जिल्ह्यातील हे प्रकरण 3 मार्च 2021 चे आहे. त्यावेळी मुलगा 19 वर्षांचा होता. मुलीच्या आईने गुन्हा दाखल केला, ज्यामध्ये त्यांच्याकडून आपल्या मुलीच्या आणि मुलाच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा हवाला देण्यात आला होता. त्यानुसार दोघांमध्ये जवळीकता निर्माण झाली होती.

Mumbai High Court
Mumbai High Court: लोकलने प्रवास करतायं, मग कोरोना नियम बंधनकारक

दरम्यान, आपण गर्भवती असल्याचा संशय आल्यानंतर मुलीने मुलाला व्हॉट्सअ‍ॅपवर यासंबंधी सांगितले, ज्यावर मुलाने उदासीन प्रतिक्रिया दिली. यामुळे संतापलेल्या मुलीने आपल्या खोलीत गळफास लावून घेतला. पोलिसांनी (Police) मार्च 2021 मध्येच आरोपीला अटक केली होती. त्याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि पॉक्सो अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Mumbai High Court
Mumbai High Court: सर्व खंडपिठांच्या न्यायालयीन कामकाजाला आज स्थगिती

असेही न्यायालयाने म्हटले

ताज्या सुनावणीनंतर न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी सांगितले की, 'मुलगी कदाचित गर्भवती होण्याच्या भीतीने चिंतेत होती. यातच मुलाकडून उदासीन प्रतिसाद मिळाल्याने तिने आत्महत्या केली. या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त करणे हे सिद्ध करणे आवश्यक आहे, जे आरोपीच्या (Accused) अचानक उदासीन प्रतिक्रियेने सिद्ध होत नाही. मुलगा लहान होता. त्यामुळे त्याला 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com