Mumbai: गणेश आगमनाच्या मुहूर्तावर कोरोना संबधित BMC ची मार्गदर्शक तत्त्वे जारी

सर्वात महत्त्वाचे तिसऱ्या लाटेत लहान मुलांच्या संसर्गाची भीती अधिक आहे. ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून इतर रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचे प्लांट बसवले जात आहेत.
Ganesh arrival
Ganesh arrivalDainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई: आज सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन होत आहे. गणपती (Ganpati)उत्सवासोबत कोरोना (Covid 19 )ही सुरु आहे. या काळात नागरिकांनी निष्काळजीपणा करून सणासुदीच्या काळात कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी BMC ने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

कोरोनाचा तिसऱ्या लाटेचा धोका वाढत आहे. परंतु तिसरी लाट येण्याबाबत अजूनही मोठा सावळा गोंधळ आहे. दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीला ही असेच घडले, तरीही खूप गोंधळ झाला. राज्य सरकारे, (State Government) काही तज्ज्ञ, तर काही जण म्हणत होते की दुसरी लाट आली आहे, तर काहींचे मत होते की ती अजून आलेली नाहीच. असेच आता मुंबईत घडत आहे. जिथे काल महापौर म्हणाले, तिसरी लाट मुंबई मध्ये आली आहे. पण आज त्यांनी यू-टर्न घेत सांगितले की तिसरी लाट अजून आलेलीच नाही.

Ganesh arrival
Ganesh Chaturthi: बाप्पा आगमनास सज्ज...

असे गृहीत धरले गेले तर तिसरी लाट अजून आलेली नाही, परंतु जशा प्रकारे मुंबईत कोरोनाचे आकडे वाढताना दिसत आहेत त्यामुळे तिसरी लाट लवकरच होईल यात शंका वाटत नाही. जर वाढत्या कोरोनाचा संसर्ग हा असाच वाढत राहिला, तर तिसऱ्या लाटेचा कहर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या महिन्यात केवळ एका आठवड्यात सापडलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ऑगस्टपेक्षा(August) या महिन्यातील सुमारे 31 टक्याची वाढ होत आहेत. याचा अर्थ संपूर्ण ऑगस्टमध्ये असलेली सुमारे 31 टक्के वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये मुंबईत ९ हजार 300 हून अधिक रुग्ण संख्या नोंदवली गेली, तर 1 सप्टेंबर ते 9 दरम्यान 2,900 पेक्षा जास्त रुग्ण संख्या झाली आहेत.

गणपती उत्सवाच्या सणामध्ये रुग्ण वाढण्याची शक्यता :

समोर येणाऱ्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे की कोरोनाचा संसर्ग पुन्हा मोठ्या प्रमाणात वेग पकडत आहे. नागरिकांच्या निष्काळजीपणामुळेच दुसऱ्या लाटेला आमंत्रण दिले गेले होते. आणि आता तीच गोष्ट पुन्हा घडताना दिसत आहे. ज्या प्रकारे बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. नागरिक मास्क घालत नाहीत, किंवा सोशल डिस्टन्स पाळत नाहीत, तसेच कोरोनाच्या नियमाना पायदळी तुडवत आहेत. ज्यामुळे कोरोनामध्ये वाढ होताना दिसून येत आहे. अश्या प्रकारची विविध करणे आहेत जी तिसऱ्या लाटेला आमंत्रण देत आहेत. लोक कोरोनाबद्दल गांभीर्य न घेऊन चूक करत आहेत आणि ही चूक सणासुदीला अधिक भयावह बनू शकते.

Ganesh arrival
Ganesh Chaturthi 2021: यंदाही बाप्पा येणार पण भक्तांना भेटणार नाही

BMC कडून गणेश उत्सवासाठी कोणती मार्गदर्शक तत्त्वे :

कोरोना काळात निष्काळजीपने बाप्पा (bappa)चा सण साजरा करणे हे अडचणीचे ठरू शकणार आहे. परंतु असे विपरीत होऊ नये, म्हणून BMC कडून गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात अली आहेत. त्यामध्ये घरगुती गणेश मूर्तीच्या आगमन आणि विसर्जन या काळात 5 पेक्षा जास्त लोकांची जमावबंदी आहे. सार्वजनिक गणेश बाप्पा चे आगमन आणि विसर्जनामध्ये 10 लोकांना सहभागी होण्याची परवानगी आहे. परंतु त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत. घरात स्थापना केलेल्या गणेश मूर्तीची उंची 2 फुटांपेक्षा जास्त नसावी. तर सार्वजनिक गणेश मूर्तींची उंची 4 फुटांपेक्षा जास्त नसावी. सर्वच गणपती मंडळांना ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करावी असेही सांगण्यात आले आहे.

मुंबईत नवीन कोविड केंद्रे :

बाप्पाच्या सणासुदीची दिशा निर्देशके किती पाळले जातात हे पाहणे गरजेचे आहे. कारण प्रत्येक सणापूर्वी (Festival)नागरिकांना असे आवाहन केले जात आहे. तसेच मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जातात. परंतु प्रत्येक वेळी सणांनंतर नवीन कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होते. याचे मुख्य कारण म्हणजे निष्काळजीपणामुळे संसर्ग वाढतो. सणासुदीच्या काळात मास्क आणि सोशल डिस्टन्सचे नियम असून, ही चूक पुन्हा पुन्हा केली जात आहे. त्याप्रमाणे यावेळीही पुनरावृत्ती केली जात आहे. याची नागरिक आणि सरकारलाही जाणीव आहे. त्यामुळे मुंबईमध्ये तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. तसेच या पार्श्वभूमीवर मुंबईत 4 नवीन कोविड केंद्रे बांधली गेली आहेत. या केंद्रामध्ये नवीन सुमारे 5000 बेड असतील.

याशिवाय, सर्वात महत्त्वाचे तिसऱ्या लाटेत लहान मुलांच्या संसर्गाची भीती अधिक आहे, त्यामुळे येथे लहान मुलांचे वॉर्ड बनवण्यात आले आहेत. या वॉर्डां मध्ये 70 टक्क्यांहून अधिक बेड हे ऑक्सिजनयुक्त आहेत. तसेच ऑक्सिजनची (Oxygen)कमतरता भासू नये म्हणून इतर रुग्णालयांमध्ये देखील ऑक्सिजनचे प्लांट बसवले जात आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com