Isha Ambani: ईशा अंबानीची जुळ्या बाळांसह आज ग्रॅड एन्ट्री, अंबानी कुटुंबीय तब्बल एवढे किलो सोनं दान करणार

उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी आज पहिल्यादाच अमेरिकेतून भारतात येणार आहे.
Isha Ambani | Anand Piramal | Isha Ambani Piramal | Isha Ambani Aanand Piramal arrive India
Isha Ambani | Anand Piramal | Isha Ambani Piramal | Isha Ambani Aanand Piramal arrive IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

देशातील प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या (Isha Ambani) आणि त्यांचे पती आनंद पिरामल (Anand Piramal) हे त्यांच्या जुळ्या बाळांसोबत आज पहिल्यांदाच अमेरिकेतून  भारतात येणार आहेत. त्यांचे ग्रॅड स्वागत आज केले जाणार आहे. स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सकाळी साडेआठ वाजता हे दोघेही व्हीआयपी गेट नंबर आठवर दाखल होणार आहे आहेत. विमानातून येताना अमेरिका आणि भारतातील स्पेशालिस्ट डॉक्टरांची टीमही त्यांच्यासोबत असणार आहे. दरम्यान याप्रसंगी अंबानी कुटुंबीय तब्बल 300 किलो सोनं दान करणार आहे. 

  • इशाच्या बाळांसाठी खास सोय

बाळांसाठी Hermes, Dior या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सचं फर्निचर आणि नर्सरी 'करुणा सिंधू' आणि 'अँटेलिया'मध्ये तयार करण्यात आली आहे. बाळांसाठी dolce gabbana, Gucci, Loro piana या ब्रँडचे खास कपडे तयार करण्यात आले आहेत. बाळांसाठी चक्क बीएमडब्ल्यू कंपनीकडून कार सीट डिझाईन करण्यात आली आहे. बाळांची देखभाल करण्यासाठी अमेरिकेहून (America) आठ स्पेशल ट्रेनिंग घेतलेल्या नॅनी येणार आहेत. 

उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची मुलगी ईशा अंबानी यांचे 12 डिसेंबर 2018 रोजी पिरामल ग्रुपचे मालक अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल यांच्याशी लग्नगाठ बांधली. देशातल्या सर्वात महागडल्या विवाह सोहळ्यांपैकी हा एक होता. या विवाह सोहळ्यात प्रसिद्ध उद्योगपती आणि सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या विवाह सोहळ्याची सर्वत्र जोरदार चर्चा झाली होती. 

कतार एअरलाईन्सच्या स्पेशल विमानाने लॉस अँजलिसवरुन ईशा अंबानी (Isha Ambani) आणि आनंद पिरामल हे मुंबईत (Mumbai) येतील. विमानातून येताना अमेरिका आणि भारतातील स्पेशालिस्ट डॉक्टरांची टीमही त्यांच्यासोबत असणार आहे. बाळांच्या स्वागतासाठी ईशा अंबानीच्या 'करुणा सिंधू' निवासस्थानावर देशभरातील एक हजार साधूसंत येणार आहेत. याप्रसंगी अंबानी कुटुंबीय तब्बल 300 किलो सोनं (Gold) दान करणार आहेत. तसेच अंबानी आणि पिरामल कुटुंबाकडून पाच अनाथाश्रम सुरु केली जाणार आहेत. जगभरातील फेमस शेफ याप्रसंगी पंचपक्वान्न बनवणार आहेत. तसेच, तिरुपती, द्वारका येथूनही मिष्ठान्न आणण्यात येतील. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com