Monsoon Update: 'गुलाब' चक्रीवादळाचा महाराष्ट्र्रालाही फटका,मुंबईसह राज्यात 2 दिवस मुसळधार

भारतीय हवामान विभागाने पुढील 12 तास मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.(Monsoon Update)
Monsoon Update: Gulab Cyclone Impact in Maharashtra heavy rain in next 2-3 days
Monsoon Update: Gulab Cyclone Impact in Maharashtra heavy rain in next 2-3 days Dainik Gomantak

भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 12 तास मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.मुंबईसह राज्यात पुढील 2-3 दिवस हा पाऊस सुरू राहील. तर आज विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिवृष्टी होणार असल्याचे देखील हवामान विभागाने सांगितले आहे (Monsoon Update). (Monsoon Update: Gulab Cyclone Impact in Maharashtra heavy rain in next 2-3 days)

बंगालच्या उपसागरावरील वातावरण शनिवारी 'गुलाब' चक्रीवादळामध्ये बदलले , ज्यामुळे भारतीय हवामान विभागाने उत्तर आंध्र प्रदेश आणि लगतच्या दक्षिण ओडिशा किनारपट्टीसाठी 'ऑरेंज' अलर्ट जारी केला आहे .उत्तर प्रदेश ,आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या काही भागात एक इशारा जारी करण्यात आला आहे, जिथे चक्रीवादळ गुलाबमुळे प्रचंड नाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुढील दोन दिवस महाराष्ट्रात मुसळधार

पुढील 2-3 दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अतिशय मुसळधार पाऊस पडणार असल्याचे सांगितले जात असतानाच महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्याबरोबरच मध्यरात्री किंवा पहाटेपासून संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील 2-3 दिवस मुसळधार ते अतिवृष्टी होईल. सोमवारीविदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडेल. 28 रोजी मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय जोरदार वाऱ्यांचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Monsoon Update: Gulab Cyclone Impact in Maharashtra heavy rain in next 2-3 days
Maharashtra: राज्यातील नक्षलग्रस्त भागांच्या विकासासाठी 1200 कोटींच्या निधीची मागणी

27 आणि 28 रोजी मुंबईत मुसळधार पाऊस

गुलाब चक्रीवादळाचा प्रभाव मुंबईतही दिसून येणार आहे 27 आणि 28 सप्टेंबर रोजी मुंबई आणि आसपासच्या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईकरांना याबाबत सावध राहण्यास सांगितले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com