'आमदारांना फुकटात घर नाहीच'

मोफत घरं दिली जाणार नसून त्यांची किंमत आकारली जाणार : जितेंद्र आव्हाड
Jitendra Awhad News, Free Houses for MLA in Maharashtra News
Jitendra Awhad News, Free Houses for MLA in Maharashtra Newsdainik gomantak
Published on
Updated on

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या घोषणा केल्या. मात्र त्यांच्या एका घोषणेने राज्यातील राजकारणात खळबळ उडवून दिली तर त्यावरून भाजपनेही आक्षेप घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 300 आमदारांना घरं देणार आसल्याची घोषणा केली. त्यावरून उलटसुलट चर्चा रंगली असतानाच चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र सोडताना, 'आमदार पळून जातील आणि सरकार पडेल म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण देताना, आमदारांना फुकटात घर मिळणार नाहीच असे म्हटले आहे. (MLAs' houses will not be free but will be priced as much, says housing development minister Jitendra Awhad)

Jitendra Awhad News, Free Houses for MLA in Maharashtra News
Onion Prices Fall: वातावरणातील बदलामुळं कांद्याने आणले शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackey) यांनी गुरुवारी अधिवेशनात बोलत आमदारांच्या घरांबद्दल (House) घोषणा केली होती. त्यावरून आमदारांना घरं का द्यावीत यावरून उलटसुलट चर्चा रंगली होती. ज्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर टीका होत होती. तर चंद्रकांत पाटील यांनीही सरकारवर टीकास्त्र सोडले. (chandrakant patil) त्यावर अखेर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Dr.Jitendra Awhad) यांनी स्पष्टीकरण दिले. त्यांनी ट्विट करताना, आमदारांना मोफत घरं दिली जाणार नसून त्यांची किंमत आमदारांना आकारली मोजावी लागणार असल्याचे म्हटले आहे. (Free Houses for MLA in Maharashtra News)

तसेच आव्हाड यांनी, मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेल्या आमदारांच्या (MLA) घरांवरून सध्या राज्यात बराच गदारोळ होत असल्याचे म्हटले आहे. तसेच, 'मी स्पष्ट करू इच्छितो की, सदर घरे ही मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत आणि बांधकाम (Construction) खर्च (अपेक्षित खर्च 70 लाख) संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे' असं आव्हाडांनी स्पष्ट केलं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com