Abdul Sattar: अब्दुल सत्तार यांच्यावर कायदेशीर कारवाई करा; महिला आयोगाचे पोलिसांना निर्देश

राज्यभरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, सत्तार यांच्या मुंबई आणि औरंगाबाद येथील निवासस्थानावर दगडफेकही करण्यात आली.
Abdul Sattar on Supriya Sule
Abdul Sattar on Supriya SuleDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील कृषीमंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यावरून महाराष्ट्रात वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यभरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, सत्तार यांच्या मुंबई आणि औरंगाबाद येथील निवासस्थानावर दगडफेकही करण्यात आली. दरम्यान, राज्य महिला आयोगाने देखील याची दखल घेऊन अब्दुल सत्तार यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे आयोगाने पोलिसांना निर्देश दिले आहेत.

Abdul Sattar on Supriya Sule
Bhide Guruji Notice: भिडे गुरूजींना महिला आयोगाची दुसऱ्यांदा नोटीस; उत्तर न दिल्यास कारवाई

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे पोलीस महासंचालकांना पत्र

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी याप्रकरणी पोलीस महासंचालकांना पत्र लिहलं आहे. "राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपमानास्पद उद्धार काढले आहेत. याबाबत अनेक तक्रारी राज्य महिला आयोगाकडे प्राप्त झाल्या आहेत. महिलांना कमी लेखणे, कर्तुत्वहनन करणाऱ्या अशा वक्तव्याची आयोगाने दखल घेतली आहे. याप्रकरणी चौकशी करून तात्काळ कारवाई करावी." असे या पत्रात लिहले आहे.

Abdul Sattar on Supriya Sule
PM Mandhan Scheme: वयोवृद्ध शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3 हजार पेन्शन, असा घ्या योजनेचा लाभ

अब्दुल सत्तारांचा माफीनामा

दरम्यान, या प्रकरणावरून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी घुमजाव करत आपण असे बोललो नाही असे म्हटले आहे. तसेच, "राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यांच्याबद्दल किंवा कोणत्याच महिलेबद्दल मी काहीच बोललो नाही. महिलांची मने दुखावतील असा कोणताच शब्द बोललो नाही. परंतु, माझ्या बोलण्याने जर कोणाची मने दुखावली असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो आणि माझा शब्द मागे घेतो, सॉरी म्हणतो.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com