सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्याच बंडखोर आमदारांसोबत सत्तेसाठी लढा देत आहेत, 40 हून अधिक आमदार एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत आहेत, अशा स्थितीत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला बंडखोर नेत्यांना भावनिक साद घालत शिवसेनेत परतण्याची विनंती केली होती. मात्र ही स्थिती आता बदलली असल्याने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
त्यांनी नुकतीच एक ऑनलाईन बैठक घेत शिवसैनिकांशी संवाद साधला यावेळी ठाकरे बोलताना म्हणाले की, जे कट्टर शिवसैनिक आहेत. आणि ज्यांची निष्ठा मातोश्रीवर आज ही कायम आहे. त्यांनीच शिवसेनेत थांबावं अन्यथा इतर ठिकाणी आपलं भविष्य उज्ज्वल वाटत असल्यास त्यांनी तिकडे निघावं असे ते यावेळी म्हणाले.
सध्या शिवसेनेचा वृक्ष काहीसा सुकला आहे. असे आपल्याला वाटेल मात्र येत्या वर्षा ऋतूत तो वृक्ष पुन्हा बहणार आहे. त्यासाठी हे झाड सुकलेले आहे. असे आपल्याला वाटते आहे. पण आता जुनी पालवी गळून पडल्याने नव्याने बहरण्याठी शिवसेना तयार आहे. आणि हा वृक्ष पुन्हा फुलेल, बहरेल याची मी खात्री देतो असे ते यावेळी म्हणाले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, जे आमचे न्हवते ते निघुन गेलेत पण त्यांनी हे लक्षात घ्यावे की भाजपची निती ही वापरा आणि फेका अशी आहे. त्यामूळे जे त्यांच्यासोबत गेले आहेत. त्यांना वापर झाल्यानंतर ते फेकून देतील असे ते म्हणाले.
भाजपने माझ्यावर किती वाईट आरोप केलेत, ते तुम्हांला ऐकून का वाईट वाटत नाही. मात्र मला नाही अशा माणसांच्या सोबत परत बसायच. जरी माझ्यासोबत कोण ही नसेल तरी चालेल मात्र मी भाजप सोबत कधी ही युतीचा विचार करु शकत नाही. भले ही आपल्यातील काही आमदारांची ईच्छा असेल तरी.
आत्तापर्यंत मी स्वत:च्या हितासाठी काहीच केले नाही. जो काही आहे ते सर्वांसोबत आहे. त्यामूळे काय यांना नेमके वाईट वाटते हे समजण्यास मार्ग नाही असे ही ते म्हणाले. तसेच निष्टा म्हणजे काय हे दाखवण्याची आता वेळ आली आहे. आणि शिवसेनेने अनेक पराभव पाहिलेत त्यामूळे आम्ही पुन्हा आमच्या शिवसेनेची बांधणी करु. यासाठी माझे कट्टर शिवसैनिक माझ्यासोबत कायम असतील यात मला शंका नाही असे ते यावेळी म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.