France Safran Project: महाराष्ट्रातील प्रकल्पांचे आऊटगोईंग सुरूच, टाटा एअरबसनंतर फ्रान्सची गुंतवणूक असलेला प्रोजेक्ट बाहेर

Maharashtra Latest News: फ्रान्सच्या बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रनचा विमान इंजन दुरुस्ती देखभालचा प्रकल्प देखिल महाराष्ट्राबाहेर
Saffron Project
Saffron ProjectDainik Gomantak

महाराष्ट्रातुन गेल्या काही दिवसात होणारे मोठे प्रकल्प इतर राज्यात गेले आहेत. सुरुवातीला वेदांता-फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) प्रकल्प गुजरातला गेला होता. त्यानंतर टाटा एअरबसचा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट (Tata Airbus Project) हा नागपूरमध्ये होणारा प्रकल्प देखील गुजरातमधील वडोदऱ्याला गेला आहे. अशातच आता आणखी एक नागपूरमध्ये होणारा प्रकल्प हैदराबादला (Hyderabad) गेला आहे. फ्रान्सच्या बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रन (Safran Project) ही विमान इंजन दुरुस्ती देखभालचा प्रकल्प नागपूरच्या मिहानमध्ये टाकणार होती. पण हा प्रकल्प आता हैदराबादला गेला आहे. जमीन मिळवण्यास वेळ झाल्यामुळे हा प्रकल्प हैदराबादला गेल्याची माहिती आहे. 

  • विरोधकांची राज्य सरकारवर टिका

भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील वातावरण अस्थिर केले असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला. 2014 नंतरच महाराष्ट्रावर वक्रदृष्टी का? असा सवालही लोंढे यांनी उपस्थित केला आहे. वेगळा विदर्भ करण्याच्या नावावर सत्तेत आलेले लोक, वेगला विदर्भ तर सोडाच पण विदर्भावर किती अन्याय करतात हा मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्रात पाण्याची विजेची मुबलकता आहे. तसेच आपल्याकडे कौशल्य असलेलं मनुष्यबळ देखील उपलब्ध आहे, तरी प्रकल्प राज्याच्या बाहेर जात असल्याचे लोंढे म्हणाले. प्रकल्प राज्याबाहेर जाणे म्हणजे हा राजकीय करंटेपणा असल्याचे लोंढे म्हणाले. सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्राच्या जनतेचे सरकारने नुकसान केल्याचे लोंढे म्हणाले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील सरकारवर टीका केली. महाराष्ट्रात जे काही चालले आहे ते बघून दु:ख वाटत असल्याचे सुळे म्हणाल्या.

  • फ्रान्सचा प्रकल्प हैदराबादला हलवण्याचा निर्णय का घेतला?

फ्रान्समधील सॅफ्रन कंपनी गेल्या दोन वर्षापासून नागपुरच्या मिहानमध्ये प्रकल्पासाठी जमिनीची चाचपणी करत होती. पण, त्यांना आवश्यक तशी जमीन या ठिकाणी उपलब्ध झाली नसल्याची माहिती मिळते आहे. या कंपनीने दोन शहरांचा पर्याय ठेवला होता. यामध्ये एक नागपूर आणि दुसरा हैदराबाद होता. पण, मिहानमध्ये जमिनीची चाचपणी करत असताना त्यांना असं जाणवलं की जमीन मिळायला उशीर लागत आहे. तसेच महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता देखील आहे. त्यामुळे सॅफ्रन कंपनीनं आपला प्रकल्प अखेर हैदराबादला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, याबाबत अद्याप राज्य सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com