महाराष्ट्रातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महायुती सरकारने 28 जून 2014 रोजी महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजना सुरु केली. महायुती सरकारची ही योजना 'मास्टरस्ट्रोक' ठरत आहे. या योजनेतर्गंत राज्यातील प्रत्येक महिलेला 1500 रुपये दिले जातात. विशेष म्हणजे, सरकारने या योजनेसाठी 50 कोटी रुपयांची आर्थिक तरतूदही केली आहे. या योजनेतर्गंत आतापर्यंत 2.5 कोटींहून अधिक महिलांनी लाभांसाठी अर्ज केला आहे.
दुसरीकडे मात्र, विरोधकांनी या योजनेला बदनाम करण्याचा खूप प्रयत्न केला. एवढचं नाहीतर त्यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीवरही सवाल उपस्थित केले. त्यांनी याविरोधात न्यायालयात खटलेही दाखल केले. एवढं असूनही योजनेची लोकप्रियता कमी झालेली नाहीये. या योजनेला 'स्वयंपूर्णतेची जीवनरेखा' मानून महिला पाठिंबा देत आहेत.
महाराष्ट्रातील अनेक महिलांसाठी लाडकी बहीण योजना ही कमाईचा एक महत्त्वाचा स्रोत बनली आहे. ज्यामुळे त्यांना छोटा व्यवसाय सुरु करता आला किंवा त्यांच्या मुलांच्या शिक्षणात गुंतवणूक करता आली. या आर्थिक सहाय्याचा विशेषतः गृहिणींना फायदा झाला आहे. उदाहरणार्थ, एका गृहिणीने योजनेचे पैसे कपड्याच्या व्यवसायात गुंतवले. तर दुसऱ्या महिलेने शिवणकामाचा व्यवसाय सुरु केला. ही उदाहरणे अधोरेखित करतात की, महिला त्यांच्या कुटुंबास आर्थिकदृष्ट्या योगदान देण्यासाठी योजनेच्या आर्थिक सहाय्याचा कसा फायदा घेत आहेत.
दरम्यान, या योजनेच्या माध्यमातून संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल एका कापड विक्रेत्या महिलेने महायुती सरकारचे आभार मानले. "मला आज महायुती सरकारचे आभार मानायचे आहेत," असे ती म्हणाली. ती पुढे म्हणाली की, ''सरकारी योजनेचा तिला आणि तिच्यासारख्या अनेक महिलांना मोठा फायदा झाला आहे.'' तर दुसऱ्या महिलेने सांगितले की, "मी आदित्य क्लॉथ सेंटर नावाचे कपड्याचे दुकान सुरु केले.''
लाडकी बहीण योजना संपूर्ण महाराष्ट्रात महिलांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. या योजनेचा अधिकाधिक महिलांना फायदा होत असल्याने त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.