Valmik Karad: पोलिस महाराष्ट्रभर होते शोधत अन् वाल्मिक कराड गोव्यासह तीन राज्यात होता फिरत!

Santosh Deshmukh Case Valmik Karad: शरणागती पत्करण्यापूर्वी कराडने तीन राज्यांचा प्रवास केला. या तीन राज्यांमध्ये गोव्याचा (Goa) देखील समावेश होता.
Valmik Karad: पोलिस महाराष्ट्रभर होते शोधत अन् वाल्मिक कराड गोव्यासह तीन राज्यात होता फिरत!
Santosh Deshmukh Case Valmik KaradDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्रात सध्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलंच गाजत आहे. या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड मागील काही दिवसांपासून फरार होता. मात्र मंगळवारी (31 डिसेंबर) कराड शरण आला. तब्बल 22 दिवसानंतर त्याने शरणागती पत्करली. गेल्या 22 दिवसांपासून सीआयडीची नऊ पथके त्याचा शोध घेत होती. परंतु पोलिसांना त्याचा सुगावा लागत नव्हता. मात्र अखेर 31 डिसेंबर रोजी त्याने शरणागती पत्करली. शरणागती पत्करण्यापूर्वी कराडने तीन राज्यांचा प्रवास केला. या तीन राज्यांमध्ये गोव्याचा (Goa) देखील समावेश होता.

तीन राज्यांचा प्रवास

दरम्यान, गेल्या 22 दिवसात कराडने गोव्यासह मध्य प्रदेश आणि कर्नाटकचा प्रवास केला. सीआयडीला शरण येण्यापूर्वी कराड उज्जैनमध्ये होता. उज्जैननंतर तो गोवा आणि कर्नाटकातून पुण्यात आला. विशेष म्हणजे, कराडने हा सगळा प्रवास स्वत:च्या कारने केल्याचे सीआयडीच्या चौकशीतून समोर आले आहे.

Valmik Karad: पोलिस महाराष्ट्रभर होते शोधत अन् वाल्मिक कराड गोव्यासह तीन राज्यात होता फिरत!
Maharashtra-Goa Crime: गोव्यात वास्तव्य, महाराष्ट्रात चोरी! 21 वर्षांचा अट्टल गुन्हेगार असा सापडला पोलिसांच्या जाळ्यात

बँक खाती गोठवली

दुसरीकडे, आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांची बँक खाती गोठवल्याची माहिती सीआयडीकडून देण्यात आली आहे. ज्या-ज्या बँकेत त्याची आणि त्याच्या सहकाऱ्यांची खाती आहेत त्या बँकांच्या नोडल अधिकाऱ्यांशी सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी संपर्क साधला होता. अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून बँक खात्याची तपशीलवार माहिती मागवली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com