Maharashtra: हॉलिवूड चित्रपटांप्रमाणे बँकेत चोरी

Bank: बँकेच्या अधिकाऱ्यांना कॅश चेस्टमधून 34.20 कोटी रुपये गहाळ
Bank cash heists
Bank cash heistsDainik Gomantak
Published on
Updated on

चोरी आणि दरोडेखोरीच्या अनेक घटना घडताना तुम्ही पाहिल्या आहेत, तुम्ही हॉलिवूड किंवा बॉलिवूड चित्रपटांमध्ये पाहिलीच असेल,मात्र ठाणे जिल्ह्यातील आशीच एका खासगी बँकेत चोरीची घटना घडली आहे, चोरट्यांनी बँक कर्मचार्‍याच्या साथीने चोरी केली , परंतु त्यांची योजना काही यशस्वी झाली नाही.चोरी करून झाल्यावर त्यानी काही पुरावे मागे ठेवले.आणि पोलिसांच्या तावडीत सापडले त्यात तीन आरोपींना अटक केली.

पोलीस निरीक्षक अनिल सुरेश होनराव यांनी सांगितले की, मानपाडा पोलीस ठाण्यात 13 जुलै रोजी एफआयआर (FIR)दाखल करण्यात आली होती, ज्यामध्ये बँकेच्या कर्मचाऱ्याने बँकेच्या तिजोरीतून 34 कोटी रुपये चोरले होते. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 58 कोटी रुपये आणि एक वाहन जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांनी सांगितले की, इसरार अबरार हुसेन कुरेशी (33), शमशाद अहमद रियाझ अहमद खान (33) आणि अनुज प्रेमशंकर गिरी (30) यांना मुंब्रा परिसरातून अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 11 जुलै रोजी बँकेत चोरी झाल्याचे समोर आले. बँकेच्या अधिकाऱ्यांना कॅश चेस्टमधून 34.20 कोटी रुपये गहाळ झाल्याचे आढळून आले. यानंतर बँक अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर तपास सुरू केला, मात्र नंतर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

Bank cash heists
Former Police Commissioner: माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक

दरम्यान, कॅश व्हॉल्ट असलेली खोली तपासली असता, एअर कंडिशन (AC) खराब झाल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. अधिक तपास केला असता त्यांना डक्टमध्ये सात बॅगा सापडल्या, ज्यामध्ये 22 कोटी रुपयांची चोरीची रोकड होती.

बँक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्ताफ शेख कॅश वॉल प्रभारी म्हणून तैनात होते. 9 जुलै रोजी चहा पिण्याच्या बहाण्याने तो बँकेतून बाहेर पडले, मात्र परत आले नाहीत. त्याच दिवशी ही घटना घडल्याचे बँक कर्मचाऱ्यांचे मत आहे. चोरटे केवळ 12.20 कोटी घेऊन पळून जाऊ शकले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी रोख रक्कम घेऊन जाण्यासाठी छोट्या ट्रकचा वापर केल्याचे प्रथमदर्शनी पाहिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com