Kolhapur:कोल्हापूरात शिवसैनिकांची धरपकड, जिल्हाप्रमुख संजय पवार पोलिसांच्या ताब्यात

Sanjay Pawar
Sanjay Pawar Dainik Gomantak
Published on
Updated on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आज (13 जुलै) कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अतिवृष्टीमुळं कोल्हापूर आणि सांगलीत (Kolhapur, Sangali) अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे दोन्ही जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्यात शिवसेनेने निदर्शने करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर प्रतिबंधात्क उपाय म्हणून पोलिसांनी शिवसैनिकांची धरपकड केली. तसेच, शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार (Kolhapur Shivsena president Sanjay Pawar detained) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Sanjay Pawar
Michael Lobo : मायकल लोबोंच्या हातातून कळंगुट निसटले

महाराष्ट्रातील विविध भागात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. (Heavy rainfall in Maharashtra) यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात अतविृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर आहेत. एकनाथ शिंदे हे आज पूरस्थिती निर्माण अशा ठिकाणी भेट देऊन तिथल्या पूरस्थितीचा आढावा घेणार आहेत. दरम्यान, शिवसेनेत दोन गट पडले असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या वेळी निदर्शने करणार असल्याची घोषणा कोल्हापूर शिवसेनेने केली होती. त्यानंतर प्रतिबंधात्क उपाय म्हणून पोलिसांनी शिवसैनिकांची धरपकड केली.

नुकतेच शिंदे-फडणवीस सरकारचा विस्तार पार पडला, यामध्ये बंडखोर आमदार अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांनी शपथ घेतली. संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार होती. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही निदर्शने होणार होती. दरम्यान, त्यापूर्वीच शिवसैनिकांची धरपकड पोलिसांनी सुरू केली. व जिल्हाप्रमुख संजय पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Sanjay Pawar
Panchayat Election : दक्षिण गोव्यातील ‘त्या’ सहा तालुक्यांवर भाजपचाच दबदबा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com