दाट धुक्यामुळे अंदाज चुकला, ट्रक पलटी होऊन दरीच्या टोकावर थांबला; दैव बलवत्तर म्हणून दोघे बचावले

Karul Ghat Accident: भरधाव असलेला ट्रक दरीच्या टोकावर येऊन थांबला. यामुळे ट्रक चालक आणि क्लिनर थोडक्यात बचावले.
Karul Ghat Truck accident dense fog
Karul Ghat Truck accident dense fogDainik Gomantak
Published on
Updated on

सिंधुदुर्ग: करुळ घाटात आयशर टेम्पोचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापूरहून सावंतवाडीला येत असताना टेम्पोचा बुधवारी सकाळी नऊ वाजता हा अपघात झाला. टेम्पो घाटातील दरीच्या टोकाला येऊन थांबला त्यामुळे चालकासह क्लिनरचे प्राण थोडक्यात बचावले. घाटात असलेल्या दाट धुक्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथून सावंतवाडीला सिमेंटच्या पत्र्याची पाने घेऊन आयशर ट्रक येत होता. करुळ घाटात असलेल्या दाट धुक्यामुळे चालकाला अंदाज न आल्याने ट्रक घाटातील संरक्षक भिंतीला जाऊन धडकला आणि पलटी झाला. भरधाव असलेला ट्रक दरीच्या टोकावर येऊन थांबला. यामुळे ट्रक चालक आणि क्लिनर थोडक्यात बचावले.

Karul Ghat Truck accident dense fog
Samay Raina: समय जिवंत आहे! समय रैनाचा कमबॅक, नव्या शोची घोषणा; भारतील स्टँडअप 'शो'साठी बुकिंग सुरु

दरम्यान, ट्रकमधील सिमेंटचे पत्र दरीत कोसळून त्यांचे नुकसान झाले आहे. दैव बलवत्तर म्हणून ट्रकमधील दोघेही थोडक्यात बचावले. ट्रक चमत्कारिकपणे काठावर थांबल्याने मोठा अनर्थ टळला. ट्रक खोल दरीत कोसळला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. चालक आणि क्लिनर सुखरुपपणे बाहेर आहे. किरकोळ जखम झाल्याने त्यांच्यावर गगनबावडा येथील रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. 

करुळ घाटातील अपघाताची माहिती वैभववाडी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. पोलिसांकडून अपघातग्रस्त ट्रक हटविण्याचे काम सुरु आहे. अपघातानंतर घाटातील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com