भारतात दहशतवाद पसरवण्यासाठी मुजाहिद्दीन, आयसिस- सिमीची हातमिळवणी? पुण्यातील तपासात धागेदोरे उघड

सुरक्षा यंत्रणांनी मागील काही दिवसांपूर्वी पुण्यात एक मोठी कारवाई केली होती. यातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे.
Terrorism
TerrorismDainik Gomantak

सुरक्षा यंत्रणांनी मागील काही दिवसांपूर्वी पुण्यात एक मोठी कारवाई केली होती. याच प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर येत आहे.

इस्लामिक स्टेट (आयएस किंवा आयएसआयएस) चं नव्हे तर इतर दोन दहशतवादी संघटना – स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) आणि इंडियन मुजाहिदीन (आयएम) यांचाही अलीकडच्या पुण्यातील घटनेत हात होता. पकडण्यात आलेले दहशतवादी या संघटनेचा भाग असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांच्या सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, 3 जुलै रोजी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) चार आरोपींना अटक केली होती, ज्यामध्ये पुणे (Pune) आणि मुंबईमधून एक तर ठाण्यातून दोन जणांना अटक केली होती.

त्यानंतर, पुणे ATS ने 18 जुलै रोजी आणखी दोघांना अटक केली, जे इस्लामिक स्टेट खोरासानसाठी काम करत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हजारीबाग, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रकरणांचा थेट संबंध समोर येत आहे.

Terrorism
Jammu And Kashmir: बारामुल्लामध्ये मोठा कट फसला, लष्कर-ए-तैय्यबाचे 3 दहशतवादी गजाआड

मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी शाहनवाज आलम हा आतापर्यंतच्या प्लॅनमधील मुख्य सूत्रधार आहे. दरम्यान, या दहशतवादी संघटना ज्या कारवायांच्या दृष्टीने जवळजवळ मृत झाल्या होत्या, त्या पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत.

त्यांनी सगळा प्लॅन अगदी हुशारीने आखला, यामध्ये त्यांनी सुरक्षा यंत्रणांना थांगपत्ताही लागू दिला नाही. सुरक्षा यंत्रणांना याबाबत माहिती मिळाली असती तर त्यांनी कारवाई केली असती.

Terrorism
Jammu And Kashmir: जम्मू-काश्मीर पोलिसांना मोठे यश, लष्कर-ए-तैयबाच्या 5 दहशतवाद्यांना अटक

सुरक्षा एजन्सीच्या सूत्रांनी केलेले मोठे खुलासे

* ते सर्व आयटी, सायबर, स्फोटके आणि सुधारित स्फोटक उपकरण (IED) मध्ये प्रशिक्षित आहेत.

* संयुक्त दहशतवादी संघटनांमध्ये वैचारिक मतभेद होते, परंतु त्यांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन काम सुरु करण्याचा निर्णय घेतला. सिमी आणि आयएमची भूमिका स्पष्ट दिसत आहे.

* त्यांच्याकडे इराक किंवा सीरियाचा (Syria) परदेशी हँडलर आहे.

* पुणे प्रकरणात सर्वांना वेगवेगळ्या वेळी निधी मिळाला. कटात सहभागी असणाऱ्या लोकांना नियमित विदेशी निधी मिळत होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com