मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर राखाडी रंगाची धुळीची चादर

वातावरणात धुके आणि धुळीचे थर दिसून येत आहेत. गेल्या महिनाभरापासून काही भागांमध्ये कडाक्याची थंडी आहे, तर रात्री-अपरात्री अवकाळी पाऊस पडत आहे.
Maharashtra Unseasonal Falling Rain
Maharashtra Unseasonal Falling Rain Dainik Gomantak
Published on
Updated on

रविवार पासून मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार थंड वारे वाहत आहे. भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) दिलेल्या इशाऱ्यांनुसार, मुंबई, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाने कहर केला आहे. उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात विजिबिलिटी खूपच कमी आहे. वातावरणात धुके आणि धुळीचे थर दिसून येत आहेत. गेल्या महिनाभरापासून काही भागांमध्ये कडाक्याची थंडी आहे, तर रात्री-अपरात्री अवकाळी पाऊस पडत आहे.

Maharashtra Unseasonal Falling Rain
महाराष्ट्रातील शाळा आजपासून होणार सुरू

मुंबईची हवा आज सर्वात खराब पातळीवर पोहोचली आहे. वायु गुणवत्ता समन्वय (AQI) 267 वर पोहोचला आहे. शहरातील अनेक भाग धुळीने आणि धुक्याने व्यापले आहेत. मालाडच्या एयर क्वालिटी इंडेक्स रिकॉर्ड 436 वरती नोंदवला गेला आणि त्यातून प्रदूषणाची तीव्रता लक्षात येते. मुंबईतील भांडुप 336, माझगाव 372, वरळी 319, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स 307, चेंबूर 347 आणि अंधेरी 340 येथे एयर क्वालिटी इंडेक्स रिकॉर्ड नोंदवण्यात आला.

मुंबईच्या वरळी भागातही हवेची पातळी अत्यंत खराब नोंदवण्यात गेली आहे. आणि कुलाबा येथीलही AQI 221 म्हणजेच खराब पातळी नोंदवण्यात आली. या वाऱ्यांमधील ओलाव्यामुळे मुंबईसह महाराष्ट्राच्या कोकण भागात उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम मध्य महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून अधूनमधून पाऊस सुरू आहे. विशेषत: मुंबईच्या समुद्रकिनारी आकाशात काळे ढग आहेत. रात्रीपासून वातावरणातील आर्द्रता वाढली आहे.

मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर फक्त धुळीची चादर आणि धुक्याचे थर दिसतात. समोर C लिंक आहे. पण ते पाहिल्यावर एखाद्या खोलीतील धुळीने माखलेल्या काचेच्या आतून आपण ते पाहत आहोत असे वाटते. दृश्यमानता पूर्णपणे कमी झाली आहे. समुद्राच्या किनाऱ्यावर एकच रंग दिसतो आणि तो म्हणजे राखाडी. धुके आणि धुळीने प्रत्येक रंग व्यापला आहे. आकाश आणि जमीन एकाच रंगाची दिसते.

Maharashtra Unseasonal Falling Rain
राज्यात काही भागांमध्ये पांढर्‍या धुक्याची चादर! गारव्यात वाढ

हवामानातील या बदलांमुळे रविवारी नवी समस्या निर्माण झाली आहे. रविवारी पाकिस्तानातून (Pakistan) आलेले धुळीचे वादळ आता अरबी समुद्रातून गुजरातमार्गे महाराष्ट्रात (Maharashtra) पोहोचले आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्यात मोठ्या प्रमाणात धुळीचे कण हवेत शोषले गेले आहेत. त्यामुळे मुंबईत विशेषतः पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर पांढऱ्या पावडरचा विचित्र थर साचला आहे.

मुंबईत (Mumbai) या पांढर्‍या धुळीच्या चादरीत दुचाकी, चारचाकी वाहने आणि घरांचा वावर आहे. पाकिस्तानातून येणारे धुळीचे वादळ महाराष्ट्रात पोहोचल्याचे अनौपचारिकपणे सांगितले जात आहे, मात्र अद्याप भारतीय हवामानशास्त्र विभागने याला दुजोरा दिलेला नाही. भारतीय हवामान विभागाचे तज्ज्ञ केएस होसाळीकर यांनी ट्विट करून धुळीचे वादळ सरकणार असल्याचे सांगितले, परंतु त्याचे कारण त्यांनी दिलेले नाही.

येत्या 12 तासांत अरबी समुद्रमार्गे उत्तर कोकण, मुंबई, ठाणे, पालघर परिसरात जोरदार वारे आणि वादळी वारे वाहतील, असे सांगण्यात आले आहे. सध्या रस्त्यावर वाहने चालवताना समोरच्या वस्तू दिसणे तर अवघड झाले आहेच, शिवाय श्वास घेण्याच्या समस्याही वाढल्या आहेत. आकाशात ढग लपून बसले आहेत. ते हवामान अधिकच निस्तेज करत आहेत. सूर्याची न दिसणारी किरणे आणि धुळीचे कण पसरल्यामुळे दृश्यमानता आणखी कमी होते.

Maharashtra Unseasonal Falling Rain
कलेला प्राधान्य देत रिक्षाचालकाने लातूरकरांना केले मंत्रमुग्ध

रविवारी मुंबईतील दादर, लोअर परळ, महालक्ष्मी आणि लगतच्या परिसरात पावसाने हजेरी लावली. मुंबई, ठाणे, पालघरसह उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव या भागांत पुन्हा एकदा पाऊस झाला असुन मुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी थंड वारे वाहत आहेत. मुंबईत साधारणपणे हिवाळा नसतो.

मात्र या सर्व कारणांमुळे मुंबईतही थंडीचा प्रकोप वाढला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात तापमान 15 अंश सेल्सिअसपर्यंत राहणार आहे. महाराष्ट्रातील कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, वेगुर्ले या तालुक्यांतील अनेक भागात आज अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसाने आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com