गुन्हेगारांना चाप लावला नाही तर त्यांची हिम्मत वाढते

शक्ती कायद्याची (Power Act)अंमलबजावणी झाली असती तर आता पर्यंत राज्यात घाणेरडे कृत्य करणाऱ्या नराधमांचा धाडस वाढले नसते.
Crime
Crime Dainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई(डोंबिवली): पोलिसांचा (Police)धाक आणि दरारा हा राज्यातील अनेक दुर्दैवी घटना यांच्या वरून दिसून येत आहे. महिलांच्या बाबतीत वाढणाऱ्या गुन्हेगारीला पूर्णपणे सरकारच जबाबदार आहे. NGO, राजकीय पक्ष,(Political parties), पोलीस प्रशासन,(police administration) आणि तज्ज्ञ यांची बैठक घेण्याची गरज आहे. वारंवार होत असलेल्या घटनांवर चाप लावला नाही तर गुन्हेगारांची हिंमत वाढते. कृष्णप्रकाश (Krishnaprakash)यांच्या सारखा दबंग अधिकारी सरकारच्या संगतीत राहून बिघडला असल्याचे बेताल वक्तव्य विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले आहे.

कृष्णप्रकाश यांच्या सारखा दबंग अधिकारी सरकारच्या संगतीत राहून बिघडला असल्याचे बेताल वक्तव्य विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले आहे.

Crime
गोव्याचा अट्टल गुन्हेगार अन्वर शेखवर जीवघेणा हल्ला; पोलिसांच्‍या सतर्कतेमुळे अनर्थ टळला !

सरकारच्याच भावना या बड्या अधिकाऱ्याच्या तोंडून व्यक्त होत असतात. बिघडलेला कायदा आणि सुव्यवस्था यात सरकारला जास्त रस आहे. सरकार स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहत नाही. आरक्षण हा इतकच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्न आहे आणि त्याबाबत बैठका घेणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

आधी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घ्या आणि वाढत्या महिलांवरील (women)अत्याचाराच्या घटना या बाबत काय करता येईल आणि त्याला आला घाला. ही मुख्यमंत्र्यांकडे आमची मागणी आहे. लॉकडाऊन (Lockdown)काळात विद्यार्थ्यांचे मोबाईलचे (mobile)वापरण्याचे प्रमाण आणि वेळ वाढला असून यामुळे विद्यार्थ्यांकडून त्यांना मानसिकतेवर मोठा परिणाम होत आहे. त्यातून समाज विघातक कृत्यांना उत्तेजना देणाऱ्या ॲप्स चा ही वापर वाढत आहे. यामुळे अश्या विकृती वाढवणाऱ्या ॲप (App)वर नियंत्रण ठेवण्याबाबत केंद्र सरकारला कळवले जाईल. असे ॲप लवकरात लवकर बंद करण्यात यावी अशी मागणी आहे.

Crime
गुन्हेगार कुणीही असो तो गुन्हेगारच असतो : किशोर राव

सर्व राज्याच्या गृहमंत्र्यांनी येत्या महिनाभरात शक्ती कायदा लागू करणार याचे आश्वासन दिले होते. मात्र आता दीड वर्ष होऊन गेले तरी अजूनही शक्ती कायदा लागू झालेला नाही. शक्ती कायद्याची अंमलबजावणी झाली असती तर आता पर्यंत राज्यात घाणेरडे कृत्य करणाऱ्या नराधमांचा धाडस वाढले नसते. शक्ती कायद्यासाठी सरकार सोबत सर्वजण आहेत. या कायद्याद्वारे नराधमांना थांबवले नाही तर स्वैराचार मोठ्या प्रमाणात वाढेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com