पार्टीचे पैसे न दिल्याने हॉटेल मालकाने सदाभाऊंचा ताफा अडवला

''तुम्ही फोनही घेत नाही आणि घेतला तरी सरळ बोलत ही नाही''
Sadabhau Khot
Sadabhau KhotDainik Gomantak
Published on
Updated on

हॉटेलची उधारी द्या, मग पुढच्या कार्यक्रमाला जा.असे म्हणत मांजरी येथील हॉटेल मालक व शेतकरी संघटनेच्या माजी पदाधिकाऱ्याने माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना अडवल्याचा प्रकार घडला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोलो येथे पंचायत समितीच्या आवारातच हा प्रकार घडल्याने सर्वांचा काही काळ गोंधळ उडाला. ( hotel owner stopped Sadabhau Khot motor convoy )

मिळालेल्या माहितीनूसार सांगोला तालुक्यांमध्ये आज पंचायत राज समितीचे पथक दौऱ्यासाठी आले होते. या दौऱ्यामध्ये आमदार अनिल पाटील, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार किशोर दराडे व आमदार सदाभाऊ खोत होते. महूद ग्रामपंचायतीची पाहणी केल्यानंतर सांगोला तालुक्यातील पंचायत समितीच्या कार्यालयाकडे आले. आमदार सदाभाऊ खोत यांची गाडी पंचायत समितीच्या आवारात आली असता हा प्रकार घडला.

Sadabhau Khot
'महाविकास आघाडीकडून राज्यसभेबाबत निष्काळजीपणा'- मंत्री उदय सामंत

यावेळी सदाभाऊ गाडीमधून उतरताच मांजरी ( ता. सांगोला ) येथील हॉटेल चालक व सध्याचे ग्रामपंचायत सदस्य अशोक शिनगारे यांनी गाडी मधून आमदार सदाभाऊ खोत खाली उतरताच 'भाऊ, तुमचे तालुक्यात स्वागत. परंतु 2014 च्या निवडणुकीचे माझी अगोदर उधारी द्या. मग तुम्ही पुढील कार्यक्रमासाठी जावा. आधी आमचा निर्णय लावा. तुम्ही फोनही घेत नाही आणि घेतला तरी व्यवस्थितही बोलत नाही.' असे म्हणू लागले.

Sadabhau Khot
'...हिटलरसारखे गॅस चेंबर बनवायचे आहे', शिवसेनेचा केंद्र सरकारवर घणाघात

2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आमदार सदाभाऊ खोत हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिले होते. त्यावेळी सांगोला तालुक्यातील मांजरी या गावचे असलेले अशोक शिनगारे यांचे हॉटेलची उधारी होती. यावरुनच शिनगारे यांनी काही काळ सदाभाऊ खोत यांना अडवून धरल्याने एकच गोंधळ उडाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com