महाराष्ट्रात मुसळधार! जूनपासून पावसामुळे 76 जणांचा मृत्यू, 838 घरं उद्ध्वस्त

महाराष्ट्रात मुसळधार पावसाने कहर केला असून, राज्यातील अनेक भागांतून पुराच्या घटनाही समोर आल्या आहेत.
Maharashtra Flood News
Maharashtra Flood NewsDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्रात (Maharashtra) मुसळधार पावसाने कहर केला असून, राज्यातील अनेक भागांतून पुराच्या घटनाही समोर आल्या आहेत. दरम्यान, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने पुरासंबंधीत घटनची आकडेवारी जाहीर केली आहे, त्यानुसार महाराष्ट्रात 1 जून 2022 पासून पावसाशी संबंधित घटनांमुळे एकूण 76 जणांना आपला जिव गमवावा लागला आहे. यासह गेल्या 24 तासांत 76 पैकी 9 जणांचा मृत्यू झाला. पूर आणि मुसळधार पावसामुळे 838 घरांचे नुकसान झाले असून 4916 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश आले आहे. (Heavy rains in Maharashtra Rains since June have killed 76 people and destroyed 838 homes)

आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पुनर्वसन विभागाकडूनही मदतकार्य सुरू असून 35 मदत शिबिरे देखील उभारण्यात आली आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले की, 1 जून 2022 पासून महाराष्ट्रात पाऊस आणि पूरसंबंधित घटनांमध्ये 125 जनावरांचाही मृत्यू झाला आणि त्याचवेळी मुसळधार पावसामुळे आसना नदीला आलेल्या पुरामुळे महाराष्ट्रातील हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील तीन गावांतील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. भारतीय हवामान खात्याने (IMD) कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात शनिवारी सकाळी 8.30 वाजता 150 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील नांदेड जिल्ह्यातील आसना नदीच्या खालच्या भागात वसलेल्या हदगाव गावातील काही लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शनिवारी हिंगोली जिल्हा दंडाधिकाऱ्यांना बोलावून लोकांना बाहेर काढण्याचे आणि इतर प्रकारची मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. हिंगोलीत गेल्या 48 तासात मुसळधार पाऊस पडल्याने आसना नदीला पूर आला असून तिचे पाणी गावांमध्ये व शेतांमध्ये शिरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com