कोकणासह, संपूर्ण महाराष्ट्रात अनेक भागात पुढील 24 तासांत जोरदार पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पूर्व आणि मध्य भारतात पावसाचा जोर(Maharashtra Rain) वाढला असून

Heavy rains are expected in many parts of Maharashtra including Konkan in next 24 hours
Heavy rains are expected in many parts of Maharashtra including Konkan in next 24 hoursDainik Gomantak

मागील काहीदिवसांपासून(Maharashtra Rain) राज्यातील अनेक भागात पावसाने(Heavy Rains) थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी तर पूरपरिस्थिती(Maharashtra Floods) निर्माण झाली आहे. अनेक भागात पावसाचे प्रमाण आता कमी झाले असले, तरी आता बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पूर्व आणि मध्य भारतात पावसाचा जोर वाढला असून उद्याही कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्राच्याकाही भागातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.( Heavy rains are expected in many parts of Maharashtra including Konkan in next 24 hours)

मॉन्सूनचा(Monsoon) आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा पश्चिम भाग काहीसा उत्तरेकडे सरकलेला पाहायला मिळत आहे. पण सध्या पूर्व भाग सर्वसाधारण स्थितीवरच आहे. उत्तर बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र सध्या पश्चिम बंगाल आणि बांग्लादेश परिसरावर दिसत आहे. दोन दिवसांत हे कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार कडे सरकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण सध्याचा विचार करता अरबी समुद्रात किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाच्या पट्ट्याचा विस्तार कमी झाला असून, तो अगोदर महाराष्ट्रापासून उत्तर केरळ पर्यंत सक्रिय होता.


Heavy rains are expected in many parts of Maharashtra including Konkan in next 24 hours
'फडणवीस हे काही आडनावं नाही': राज ठाकरे

आता हवामान खात्याच्या अंदाजानुसार कमी दाबाचे क्षेत्र मध्य भारताकडे सरकण्याची शक्यता असून, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, छत्तीसगड मध्य प्रदेशसह उत्तर भारतात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान अरबी समुद्रावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशमध्येही पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, उद्या कोकणात ठाणे, रत्नागिरी, रायगड, मुंबई, तसेच कोल्हापूर, पुणे, सातारा जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे विदर्भातही बऱ्याच हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा, तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com