रत्नागिरी: गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाची सुरुवात झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसाचा जोर हा काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी जोरदार होता. दरम्यान, आज राज्यामध्ये पुढच्या 24 तासात कोकण,(Konkan) मध्य महाराष्ट्रासह (Maharashtra) काही भागात पावसाची दाट शक्यता प्रादेशिक हवामान खात्याकडून (Meteorological Department) वर्तवण्यात आली आहे.
अशीच परिस्थिती शनिवारी विदर्भात काही ठिकाणी असू शकते असाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यामुळे कोकणासह काही ठिकाणी प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सप्टेंबरमध्ये तयार झालेल्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे येत्या आठवड्यातील चक्रीवादळामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास आणखी विलंब होणार आहे. याचा प्रवास वायव्य भारताच्या भागातून 6 ऑक्टोबर पासून सुरु होईल. एकंदरीत याचा हा प्रवास 17 सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे. या परतीच्या पावसाचा प्रवास हा दुसऱ्यांदा सर्वाधिक सावकाश असलेला प्रवास आहे.असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.