महाराष्ट्रातील मुंबई, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूरसह अनेक ठिकाणी पावसाची दमदार हजेरी

कोकणात जगबुडी, सावित्री नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
Heavy rain
Heavy rainDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्रातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून शेतकरी वर्ग पावसाची आतूरतेने वाट पाहतो आहे. कारण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणी केली असल्याने या पिकांना पावसाची नितांत आवश्यकता होती. कारण मानवनिर्मीत पाणी पुरवठा होत असला तरी संपुर्ण कृषी क्षेत्राला पाण्याचा पूरवठा केला जाऊ शकत नाही. पण गेल्या दोन - तीन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामूळे शेतकरी वर्ग काहीसा सुखावला आहे. ( Heavy rain in Mumbai, Ratnagiri, Raigad, Kolhapur parts of Maharashtra )

Heavy rain
शहर नामांतरास विरोध केल्याने मला जीवे मारण्याची धमकी - अबू आझमी

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील मुंबई, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूरसह विविध ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर, रायगड जिल्ह्यात सावित्री नदी देखील इशारा पातळीवरुन वाहत आहे. याबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात देखील जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईतील दक्षिण मुंबई, दादर, घाटकोपर, नवी मुंबई आणि ठाण्यात जोरदार पाऊस झाला आहे.

Heavy rain
अमरावती हत्याकांड: कोल्हे यांच्या हत्येचा कट कसा रचला? वाचा संपूर्ण प्रकरण

असे चित्र असताना रत्नागिरी जिल्ह्यातील नगर परिषदेतर्फे याची नागरिकांना कल्पना देण्यासाठी भोंगा वाजविण्यात आला. रत्नागिरी जिल्हयात सोमवारी मोठ्या पावसामुळे मंडणगड येथेही पावसाने जोर धरला आहे, भिंगळोली समर्थ कृपा अपार्टमेंट समर्थ नगर येथे पाणी आले होते या सगळ्या परिस्थितीवर मंडणगड तालुका प्राशसन लक्ष ठेऊन आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com