Kolhapur: कोल्हापुरात गोवा बनावटीचे 4 लाख किमतीचे मद्य जप्त; 31st च्या रात्री उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Goa-Made Liquor Seized Kolhapur: पथकाने शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास क्रशर चौकात सापळा रचून वाहनाची तपासणी केली.
Kolhapur: कोल्हापुरात गोवा बनावटीचे 4 लाख किमतीचे मद्य जप्त; 31st च्या रात्री उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
LiquorDainik Gomantak
Published on
Updated on

Goa-Made Liquor Seized Kolhapur

कोल्हापूर: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा जप्त केला. ३१ डिसेंबरच्या रात्री साने गुरुजी क्रशर चौकात केलेल्या या कारवाईत सुमारे चार लाख रुपयांच्या दारु जप्त करण्यात आलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, राधानगरी मार्गावरुन गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली. या पथकाने शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास क्रशर चौकात सापळा रचून वाहनाची तपासणी केली. यावेळी एका टेम्पोमध्ये गोवा बनावटीच्या दारूचे 55 बॉक्स आढळून आले. या मद्याची एकूण किंमत सुमारे 4 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

Kolhapur: कोल्हापुरात गोवा बनावटीचे 4 लाख किमतीचे मद्य जप्त; 31st च्या रात्री उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
Goa Crime: कोलवा बीचवर तीन बहिणींची फ्री-स्टाईल मारामारी; झिंज्या उपटल्या, पोलिसांनाही धक्काबुक्की

या कारवाईचे नेतृत्व उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी केले. तपास पथकात उपनिरीक्षक रोहिदास वाजे, सत्यवान भगत, उपनिरीक्षक मुकेश लाडके, जवान राहुल गुरव, गणेश सानप, प्रसाद पाटील, पंकज खानविलकर, किरण चोपडे, ज्योती शिंदे आणि सरिता पाटणे यांचा समावेश होता. अवैध दारू तस्करीच्या पार्श्वभूमीवर पथक तैनात करण्यात आले होते.

Kolhapur: कोल्हापुरात गोवा बनावटीचे 4 लाख किमतीचे मद्य जप्त; 31st च्या रात्री उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
Water Sports NOC: गोव्यात जलक्रीडा उपक्रमांना एनओसी आवश्‍यक; मंत्री खंवटेंनी केला महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर

अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अधिक तपास सुरु असून, दारूचा मूळ स्त्रोत आणि तस्करीत सामिल असलेल्या इतर आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न केला जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com