मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गॅस टँकर अपघात; तिघांचा मृत्यू

सुदैवाने या अपघातात गॅस गळती झाली नसली तरी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
Gas Tanker Accident
Gas Tanker AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

खोपोली एक्झिट जवळील उतारानजीक पुण्याहून मुंबईकडे गॅस घेऊन जात असलेल्या टँकर अपघात झाल्याने भीषन अपघात झाला असुन या अपघातात आत्तापर्यंत तीघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दुपारी १२ च्या सुमारास हा अपघात घडला असुन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. (Gas tanker accident on Mumbai-Pune Expressway; Three died )

Gas Tanker Accident
'आसानी' चक्रीवादळाने केले रौद्र रूप धारण, या राज्यांना सतर्कतेचा इशारा

मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर प्रोपोलिन गॅस टँकर जात असताना तो उलटल्याची घटना घडली आहे. यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला असून या अपघातात गॅस टँकरचा चालक देखील गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुणे येथे रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दरम्यान महामार्गावरच टँकर उलटल्याने दोन्ही बाजुची वाहतुक थांबविण्यात आली आहे. यावेळी टँकरला ती गाड्या धडकल्याचे ही स्पष्ट झालं आहे.

Gas Tanker Accident
...जम्मू-काश्मीरमध्ये भाजप करणार सरकार स्थापन? संपूर्ण गणित घ्या समजून

हा अपघात घडल्या - घडल्या तातडीने बोरघाट पोलीस यंत्रणा, आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, लोकमान्य हॉस्पिटल, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहे. यावेळी टँकरमधील गॅसची गळती झाली नाही. तसेच सध्या टँकर उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. खबरदारी म्हणून खोपोली अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी पाण्याचा मारा करण्यासाठी सज्ज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com