
सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा गगनबावडा घाट सध्या धोकादायक बनला आहे. शनिवारी (४ सप्टेंबर) सकाळी आठच्या सुमारास घाटात मोठ्या प्रमाणावर दरड कोसळली. त्यामुळे घाटातून होणारी सर्व प्रकारची वाहतूक ठप्प झाली. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने हा घाट रस्ता १२ सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरड कोसळल्यानंतर घाटात अनेक वाहने अडकली होती. तातडीने बचावकार्य सुरू करून वाहने पर्यायी मार्गावर वळवण्यात आली. दरड हटवण्याचे काम तत्काळ सुरू करण्यात आले असले तरी सायंकाळी अंधारामुळे काम थांबवावे लागले. मात्र आज सकाळपासून पुन्हा कामाला वेग देण्यात आला आहे.
गगनबावडा घाट हा कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील प्रमुख संपर्क मार्ग आहे. या घाटातून दररोज प्रवासी तसेच मालवाहतूक करणारी शेकडो वाहने ये-जा करतात.
पण गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे डोंगरकड्यांतील माती सैल झाली असून दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रवाशांनी अनावश्यक धोका पत्करू नये, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
पर्यायी मार्ग
खारेपाटण – गगनबावडा राज्य महामार्ग क्र. १७१ (भुईबावडा घाट मार्गे)
देवगड – निपाणी राज्य महामार्ग क्र. १७८ (फोंडा घाट मार्गे)
दरड हटवण्याचे काम पूर्ण होऊन घाट मार्ग सुरक्षित झाल्यानंतरच वाहतुकीस परवानगी देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.