मुंबई : मुंबै बँकेसाठी प्रवीण दरेकर यांनी मजूर संस्थेचे प्रतिनिधी म्हणून निवडून आले होते. यावेळी त्यांनी मजूर प्रवर्गातूनच अर्ज भरला होता. मात्र, निवडणुकीचा निकाल जाहीर होत असतानाच दरेकर यांना मजूर वर्गासाठी अपात्र घोषित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी मजूर प्रवर्गातील संचालकपदाचा राजीनामा दिला होता. त्याप्रकरणी आक्षेप घेत आपकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्याप्रमाणे दरेकर यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Fraud case filed against Praveen Darekar)
मुंबै जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (MUMBAI DISTRICT CENTRAL COOPERATIVE BANK LIMITED) प्रवीण दरेकर हे मजूर आणि नागरी सहकार बँक अशा दोन्ही वर्गातून उभे राहिले होते. त्यावेळी दरेकर यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात कुटुंबाची स्थावर मालमत्ता २ कोटी ९ लाख रुपये असल्याचे दाखवले होते. तसेच विरोधी पक्षनेते म्हणून दरेकर यांना २ लाख ५० हजार मानधन मिळत असल्याचेही नमुद केले होते.
दरम्यान आपने त्यावर अक्षेप घेत सहकार विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यातक्रारीवरून सहकार विभागाने नोटीस बजावली होती. तर त्या नोटीसीद्वारे दरेकर (Pravin Darekar) यांना तुम्ही, मजूर आहात की नाही, अशी विचारणा करण्यात आली होती. तसेच प्रतिज्ञापत्राप्रमाणे कुटुंबाची स्थावर मालमत्ता आणि विरोधी पक्षनेते म्हणून मिळणारे मानधन यामुळे प्रथमदर्शनी मजूर असल्याचे दिसून येत नसल्याचेही नोटिशीत नमुद करण्यात आले होते. त्यावर निर्णय घेताना सहकार (Co-operation) विभागाचे सह निबंधक बाजीराव शिंदे यांनी दरेकर यांना अपात्र घोषित केले होते.
यानंतर मुख्यमंत्री (CM) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तसेच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील (cooperation minister balasaheb patil) यांच्याकडे आपने दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे सहकार विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. मात्र आता सहकार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार नव्हे तर आम आदमी पक्षाच्या (AAP) तक्रारीनुसार पोलिसांनी (Police) हा गुन्हा दाखल केला.
कायदेशीर प्रक्रियेने न्यायालयात उत्तर देऊ
आपल्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा हा सुडबुद्धीने करण्यात येत असल्याचा आरोप दरेकर यांनी केला आहे. तसेच अधिकाऱ्यांवर दबाव टाकत हा गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आपल्या विरोधात षडयंत्र रचण्यात आले आहे. त्यामुळे कायदेशीर प्रक्रियेने न्यायालयात (Court) याप्रकरणी उत्तर देऊ, असे दरेकर यांनी म्हटले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.