Hoarding Collapses in Pune: पाऊस आला म्हणून आडोशाला थांबले अन्... पुण्यात होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू

पाऊस आणि वारा सुटल्यामुळे काहीजण होर्डिंगचा आडोसा घेण्यासाठी थांबले होते.
Pune Accident
Pune AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Hoarding collapses in Pune: पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे मोठा अपघात झाला असून, यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पाऊस आणि वारा सुटल्यामुळे काहीजण होर्डिंगचा आडोसा घेण्यासाठी थांबले, मात्र होर्डिंगच त्यांच्यावर कोसळले आणि यात पाचजणांचा मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत.

पिंपरी चिंचवडच्या किवळे येथे सोमवारी (दि.17) सायंकाळी ही घटना घडली.

(Hoarding Collapsed on Mumbai - Bangalore Highway Service Road in Pimpri Chinchwad)

मागील काही दिवसांपासून पुण्यात हवामान बदल दिसून येत आहे. यात कधी पाऊस, ऊन, वारा, वादळ यांचा खेळ सुरू आहे. दरम्यान, आज सायंकाळी किवळे आणि इतर परिसरात झालेल्या पावसाचा फटका काही लोकांना बसला व त्यात पाचजणांना आपला जीव गमावावा लागला.

घटना घडल्यानंतर पालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी बचावकार्य सुरू आले. या घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर समोर आला असून, घटनास्थळी सुरू असलेली बचावाची लगबग दिसत आहे.

जेसीबीच्या सहाय्याने होर्डिंगचे भाग काही प्रमाणात बाजूला करून त्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. मात्र, दुर्दैवाने यामध्ये चार महिला आणि एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

मृत्यू झालेल्या व्यक्ती आणि जखमी जवळच असलेल्या एका बांधकाम साइटवर काम करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

दरम्यान, तीन वर्षापूर्वी देखील अशापद्धतीने पुण्यात एक होर्डिंग कोसळला होता यात तीन लोकांना आपला जीव गमावावा लागला होता. पुणे रेल्वे स्थानक परिसरात ही घटना घडली होती. त्यानंतर पुण्यात अवैध होर्डिंगचा मुद्दा एैरणीवर आला होता. त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये घडलेल्या घटनेने अवैध होर्डिंगचा विषय पुन्हा पुढे आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com