अर्थिक व्यवहार अपहार प्रकरणी बच्चू कडूंवर गुन्हा दाखल

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्षांनी केला आरोप
Bachu kudu
Bachu kuduDainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई : दिव्यांगाचे प्रश्न सोडवण्यात अग्रभागी असणाऱ्या महाराष्ट्रातील प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा तसेच राज्यमंत्री व अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर रस्ते कामात अपहार प्रकरणी बुधवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार अकोला शहर कोतवाली पोलीस ठाण्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी दिली होती. त्या तक्रारीवर न्यायालयाच्या आदेशान्वये कारवाई करून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Financial transaction fraud case filed against Bachchu Kadu in maharashtra )

Bachu kudu
नवनीत राणांचे दाऊदशी कनेक्शन, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

अकोला जिल्हा नियोजन समितीकडे पाठवलेल्या रस्त्याच्या कामाच्या प्रस्तावांमध्ये परस्पर बदल करून अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री बच्चू कडू यांनी एक कोटी ९५ लाख रुपयांच्या निधीचा अपहार केल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीच्यावतीने दाखल करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी कारवाई न केल्याने डॉ.पुंडकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १५६ (३) अंतर्गत अकोला न्यायालयात प्रकरण दाखल केले.

Bachu kudu
पुन्हा बदलणार हवामानाचा मूड, देशात उष्णतेच्या लाटेचा अंदाज

पालकमंत्री लोकसेवक असल्याने गुन्हा दाखल करण्यासाठी ९० दिवसांच्या आत राज्यपालांची परवानगी घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. दरम्यान, वंचितच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. राज्यपालांनी कायद्यानुसार दस्तऐवज सादर करण्याचे त्यांना सांगितले. राज्यपालांनी नियमानुसार कारवाई करण्याचे आदेशही प्रशासनाला दिले होते. पोलिसांनी राज्यमंत्री कडू यांचे विरोधात भादंवि कलम ४०५, ४०९, ४२०, ४६८, ४७१ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com