मुंबई: कोरोनाचा (corona) नवा विषाणू ओमिक्रॉन (Omicron) दक्षिण आफ्रिकेमध्ये याचे रुग्ण सापडले होते. यानंतर आता ओमिक्रॉन विषाणू भारतात दाखल झाला आहे. गुरुवारी कर्नाटकात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडले आहेत. तसेच मुंबईतही त्याची भीती वाढली आहे. 10 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान दक्षिण आफ्रिकेसह परदेशातून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेले 9 आंतरराष्ट्रीय प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. परंतु Omicron झाला आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) या 9 प्रवाशांमध्ये कोरोनाचा ओमिक्रॉन प्रकार होता की नाही याची पुष्टी करण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंगसाठी नमुने पाठवण्यात आले आहेत. त्याच वेळी, नवीन प्रकाराचा धोका लक्षात घेता, मुंबईमध्ये नियम कठोर करण्यात आले आहेत.
महापौर किशोरी पेडणेकर याचे वक्तव्य:
राज्यातील कोरोनाबाबतच्या तयारीबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) म्हणाल्या की, युरोपीय देशातून येणाऱ्या लोकांना आधीच क्वारंटाईन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यासोबतच मुंबईच्या महापौरांनी सांगितले की, कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता सर्व फील्ड हॉस्पिटल, ऑक्सिजन बेड आणि ICU उपलब्ध आहेत. ओमिक्रॉन संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी सरकार पूर्ण खबरदारी घेत आहे.
परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना आठवडाभर क्वारंटाईन
किशोरी पेडणेकर यांनी गुरुवारी दावा केला की, मुंबईत कोरोनाचे नवीन प्रकार ओमिक्रॉनशी संबंधित एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र तरीही परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना आठवडाभर क्वारंटाईन करण्यात येत आहे. त्यांनी सांगितले की, क्वारंटाईननंतर पुन्हा प्रवाशांची कोरोना चाचणी करावी लागेल. BMC च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या आठवड्यात आफ्रिकन देशांतून सुमारे एक हजार प्रवासी मुंबईत आले होते. मात्र त्याला केवळ 466 लोकांचीच माहिती मिळू शकली.
RT-PCR बंधनकारक
त्याचबरोबर देशांतर्गत विमान प्रवासासाठीही राज्य सरकारने प्रवाशांना संपूर्ण कोरोना लसीकरण करणे आवश्यक केले आहे. सर्व प्रवाशांनी बोर्डिंगच्या 72 तास आधी कोरोना निगेटिव्ह RT-PCR रिपोर्ट दाखवणे आवश्यक आहे. त्याच वेळी, लसीकरण प्रमाणपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. जे प्रवासी विमान प्रवासासाठी विमानतळावर या दोन नियमांचे पालन करणार नाहीत त्यांना प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. केंद्र सरकारचे पत्र आल्यानंतर उद्धव सरकारने हे कठोर पाऊल उचलले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.