Sindhudurg Earthquake News : सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यात भुकंपाचे सौम्य धक्के

भुकंपाची 3.0 रिश्टर स्केल इतकी नोंद
Earthquake In Afghanistan
Earthquake In AfghanistanDainik Gomantak

earthquake in sawantwadi : सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर येत आहे. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.0 इतकी मोजण्यात आली. याचा केंद्रबिंदू नेमका कुठे आहे ते निश्चित झालेले नाही. याबाबतची नोंद कोयना धरण प्रकल्पावरुन घेण्यात आली, अशी माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली.

दरम्यान, हा भूकंप सावंतवाडीच्या पूर्वेला 4 किलोमीटर आणि खोली 5 किलोमीटर असा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यात रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाचा धक्का 3.0 रिश्टर स्केल इतका नोंदविण्यात आला आहे.

सह्याद्री पट्ट्यातील सांगेली सह माडखोल, कलंबिस्त, सरमळे, ओटवणे, कारिवडे, कोनशी, भालावल, असनिये, ओवळीये आदी गावांमध्ये मोठा आवाज होवून सौम्य धक्के जाणवल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com