

महाराष्ट्रात कोरोनाने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असताना आता दुसरीकडे महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसानं शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बीड, बुलढाणा, लातूर, सांगोला, नांदेड जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्याच्या पावसानं मोठी वित्तहानी झाल्याची माहिती समोर आली आहे. तर काही ठिकाणी वीज कोसळून जीवितहानी झाल्याचे समोर आले आहे. (Double crisis on Maharashtra; After Corona, untimely rains caused major damage in Maharashtra)
बीडमधील धारूर तालुक्यातील आसोला याठिकाणी शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जाहागीर मोहा याठिकाणी फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. तर या पावसाने छोट्या नदी नाल्यानाही पाणी आले आहे. परळीतील काही ठिकाणी पावसाने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
तर बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव परिसर, डोनगाव या परिसरात पावसामुळे शेतात कांदा ,गहू काढणाऱ्या शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. तर नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील मुगट याठिकाणी शेतात काम करणाऱ्या एका महिलेच्या अंगावर वीज पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर इतर तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
जालन्यातील घनसावंगी तालुक्यालाही आज पावसाने झोडपून काढले. माहेर जवळा, चिंचोली, पिंपरी ,आवलगाव या ठिकाणी वादळी वाऱ्याच्या पावसाने आंबा मोसंबी आणि इतर फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर पंढरपूर रोड, बिलेवाडी, बुरांडे वस्ती, सावंत वस्ती, सांगोला परिसराला जोरदार गारांच्या पावसाने झोडपून काढले आहे.
धक्कादायक गोष्ट म्हणजे,लातूर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे 19 जनावरे अंगावर वीज पडून आणि काही पाण्यात वाहून गेल्यामुळे दगावली आहे. याशिवाय औराद शाहजनी, उस्तूरी, कासार बालकुंदा, निलंगा, निलंगा याठिकाणीही अवकाळी पवसमुएल आणि वीज पडून काही जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.