कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावरती वादग्रस्त (Controversial statement of Nana Patole) विधान केले होते. या प्रकरणावरती भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी बोलताना प्रतीक्रिया दिली आहे की, शारिरीक उंची वाढल्याने बैद्धीक उंची वाढते असं नाही. या वरुन कॉग्रेसच्या नेत्यांमध्ये मोदीजींबद्दल मनामध्ये किती असुयाय भरला आहे हे सहजरित्या दिसुन येते आहे.
नाना पटोले बोलले ही कॉंग्रेसची भूमीका आहे. लोकशाहीमध्ये असे विचार असने म्हणजे हे लोकशाहीसाठी घातक आहे. आमच्या एका कार्यकरत्याने माननीय मुख्यमंत्र्याच्या पत्नीला राबडी देवी म्हटले तर त्यांच्यावरती पोलीस केस झाली, रात्री अपरात्री त्यांच्या घरी पोलीस गेले, आणि नाना पटोलेंनी पंतप्रधानांना मारु शकतो अश्या प्रकारची धमकी दिली तेव्हा त्यांच्या विरुद्ध साधा FIR देखील दाखल केला जात नाही. याचा अर्थ असा की, या राज्यात कायदा हा माणुस बघून चालणार आहे.
नाना पटोलेंवरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे, एखादी व्यक्ती पंतप्रधानांना मारु शकतो असं म्हणतो तर हा गुन्हांच आहे. केंद्रीय मंत्र्यांना रातोरात अरेस्ट करणारे पोलिस आता का शांत आहेत? का तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करत नाही? तुमची सिलेक्टीव्ह काम चालली आहेत. पोलीस विभागज्या राज्यांमध्ये सिलेक्टीव्ह होते त्या राज्याची अधोगती झाल्या शिवाय राहत नाही.
राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारी आहे, की देशाच्या पंतप्रधानांना जिवे मारण्याची धमकी दिली जाते, तर तिथे कारवाई झालीच पाहिजे हे त्यांचे कर्तव्य आहे, उपकार नाहीयेत. उत्पल पर्रिकर यांच्या भाजपच्या उमेदवारी बद्दलचा निर्णय राष्ट्रीय भारतीय जनता पक्ष घेईल. पर्रिकरांचा परिवार हा आमचा परिवार पण पक्षाचे काही नियम आहेत, पक्षाच्या निर्णयाचं पालन जर उत्पल पर्रिकरांनी (Utpal Parrikar) केल तर त्यांना मोठ राजकीय भविष्य आहे. असं विधान फडणवीसांनी केलं आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.